Dhaakad : कंगनाचा 'धाकड' ठरला सुपरफ्लॉप; रिलीजच्या आठव्या दिवशी देशभरात 20 तिकिटांची विक्री
Kangana Ranaut : कंगना रनौतचा 'धाकड' सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे.
Dhaakad Box Office Collection : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'धाकड' (Dhaakad) आणि कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने आहेत. 'भूल भुलैया 2'ने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. पण कंगनाचा 'धाकड' मात्र फ्लॉप ठरला आहे. रिलीजच्या आठव्या दिवशी धाकडने देशभरात फक्त 20 तिकिटे विकली आहेत.
'धाकड' सिनेमा 80 कोटी ते 90 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र अयशस्वी झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई केली नसल्याने हा सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो, असेही म्हटले जात आहे. 'धाकड' आणि 'भूल भुलैया 2' हे दोन्ही सिनेमे 20 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
'धाकड'ने पहिल्या दिवशी केली फक्त एक कोटींची कमाई
कंगनाच्या 'धाकड' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पण दुसरीकडे प्रेक्षकांना 'भूल भुलैया 2' ची क्रेझ होती. त्यामुळे प्रेक्षकांनी रिलीजच्या पहिल्या दिवशी 'भूल भुलैया 2' ला पसंती दर्शवली. 'भूल भुलैया 2'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 14.11 कोटींची कमाई केली होती. तर दुसरीकडे कंगनाच्या 'धाकड' सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी खूपच कमी कमाई केली. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने फक्त एक कोटींचा गल्ला जमवला होता.
'धाकड' हा एक अॅक्शन ड्रामा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केलं आहे. या सिनेमात कंगना रनौत, अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने कंगनाने ‘रॉ एजंट’ची भूमिका साकारली आहे. तर 'भूल भुलैया 2' सिनेमाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केलं आहे.
'धाकड'मध्ये अॅक्शनचा तडका
कंगनाचा 'धाकड' सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात कंगनाचा एक वेगळा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सिनेमात कंगनाने एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या