Taarak Mehta Ka Ooltah chashmah : पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा, ‘तारक मेहता...’मध्ये ‘दया भाभी’ परतली, पण...
Taarak Mehta Ka Ooltah chashmah : नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये दया गोकुळधाम सोसायटीमध्ये परतताना दाखवली होती. मात्र, आता पुन्हा एकदा चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
Taarak Mehta Ka Ooltah chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah chashmah) या मालिकेचे सगळेच चाहते दया भाभीच्या एन्ट्रीसाठी प्रचंड उत्सुक होते. नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये दया गोकुळधाम सोसायटीमध्ये परतताना दाखवली होती. मात्र, आता पुन्हा एकदा चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे. दयाबेन गोकुळधाममध्ये येत असल्याचं बोललं जात होतं. पण, त्यानंतर सुंदर पुन्हा नवी योजना बनवतोय हे ऐकून चाहत्यांना शंका आली आणि त्यांची शंका खरी ठरली. पुन्हा एकदा प्रेक्षकांची निराशा झाली आहे. कारण, दयाबेनचे पुनरागमन पुन्हा एकदा लांबणीवर गेले आहे.
सध्या मालिकेमध्ये असे दाखवले जात होते की, सुंदरलालने जेठालालला वचन दिले होते, तो यावेळी नक्कीच दयाला मुंबईला घेऊन येईल. तो मुंबईला आला, पण दयाबेन त्याच्या सोबत आली नाही. खऱ्याखुऱ्या दया ऐवजी तिचा कट कट आऊट सुंदर सोबत घेऊन आला होता. हा कट आऊट पाहताच जेठालालला राग आला आणि तो खूप उदास दिसत होता. त्याचवेळी गोकुळधाममधील रहिवाशांनाही यामुळे धक्का बसला.
जेठालालने दिला अल्टिमेटम
दया या वेळीदेखील गोकुळधाम सोसायटीत पोहोचलेली नाही. यामुळे रागाच्या भरात जेठालालने सुंदरलालला अल्टिमेटम दिला आहे. दोन महिन्यांत दया न आल्यास अन्न-पाणी त्याग करणार असल्याचे त्याने सर्वांसमोर जाहीर केले आहे. त्यामुळे कथेच्या या ट्रॅकनुसार दया भाभी या शोमध्ये परत येण्यास आणखी वेळ जाण्याची शक्यता आहे. अर्थात दोन महिन्यांत दया पुन्हा एकदा मालिकेमध्ये परतेल, अशी शक्यता आहे. मात्र, पुन्हा एकदा निराशा झाल्याने प्रेक्षकही संतापले आहेत.
दिशा वाकाणी की, नवी अभिनेत्री?
‘दया भाभी’ परतणार दिशा वाकाणीची जागा नवी अभिनेत्री घेणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. अभिनेत्री दिशा वाकाणी नुकतीच पुन्हा एकदा आई झाली आहे आणि आता तिची शोमध्ये परतण्याची शक्यता खूपच कमी आहे. 2017 मध्ये, जेव्हा ती आई झाली, तेव्हापासून ती परतलीच नव्हती. अशा परिस्थितीत दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर दिशाला मालिकेत परतणे सोपे असणार नाहीय. त्यामुळे आता असे बोलले जात आहे की, निर्मात्यांनी नव्या दयाबेनचा शोध सुरू केला आहे आणि लवकरच दिशा वाकाणीऐवजी नव्या अभिनेत्रीला ‘दयाबेन’च्या जागी या मालिकेमध्ये परत आणले जाईल.
हेही वाचा :
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : अखेर तो क्षण आला! ‘गोकुळधाम सोसायटी’मध्ये होणार ‘दयाबेन’ची वापसी!