Karanvir Bohra : महिलेला जीवे मारण्याची धमकी, अभिनेता करणवीर बोहराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
करणवीर बोहरासह सहा जणांविरुद्ध मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Karanvir Bohra : अभिनेता मनोज महेंद्रकुमार बोहरा उर्फ करणवीर बोहरा (Karanvir Bohra) याच्यासह सहा जणांविरुद्ध मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करणवीर बोहरावर ओशिवरा भागात राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेकडून 1 कोटी 99 लाख रुपये घेऊन त्यामधील काही रक्कम ही परत न केल्याचा आरोप आहे. ही महिला गारमेंटचा व्यवसाय करते.
2019 मध्ये करणवीरचा 'हमे तुमसे प्यार कितना' हा चित्रपट रिलीज झाला. तेव्हा करणवीरनं ओशिवरा भागात राहणाऱ्या महिलेशी मैत्री केली, हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी महिलेकडून 35 लाख रुपये घेतले. त्यानंतर आरटीजीएसद्वारे 1 कोटी 66 लाख रुपयेही घेतले, असा दावा त्या महिलेनं केला आहे.
पैसे घेताना करणवीरनं अडीच टक्के व्याजाने पैसे परत करणार असल्याचे सांगितल्यावर महिलेने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. करणवीरनं त्याच्या फ्लॅटच्या कागदपत्रांचे झेरॉक्स महिलेला दिले, असंही महिलेनं सांगितलं.
शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली: महिलेचा दावा
करणवीरनं एक कोटीहून अधिक रक्कम परत केली आहे, मात्र उर्वरित रक्कम देत नसल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. करणवीरची पत्नी तजिंदर सिंधू, आई मधुलता आणि करणवीर यांच्याशी पैशांबाबत बोलताना प्रथम उडवा उडवीची उत्तरं दिली आणि नंतर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असा दावा महिलेने केला आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत. कसौटी जिंदगी की, नागिन या मालिकांमध्ये करणवीरनं काम केलं आहे.
हेही वाचा :
- Kim Kardashian : क्रिस्टल्स निघाले, धागे तुटले! किम कर्दाशियनने परिधान केलेल्या मार्लिन मुन्रोंच्या ड्रेसचं मोठं नुकसान
- Coffee With Karan Season 7 : कॉफी विथ करणचा 7 वा सिझन 'या' दिवशी होणार प्रदर्शित; जाणून घ्या कोण-कोण होणार सामील
- Zol Zaal : 'झोलझाल' सिनेमातील वैशाली सामंतने गायलेलं 'झोलझाल' गाणं प्रेक्षकांसाठी ठरणार पर्वणी