Entertainment News Live Updates 14 June: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

प्रियांका कुलकर्णी Last Updated: 14 Jun 2022 11:35 PM
'झोलझाल' सिनेमातील वैशाली सामंतने गायलेलं 'झोलझाल' गाणं प्रेक्षकांसाठी ठरणार पर्वणी

‘झोलझाल’ (Zol Zaal) हा सिनेमा 1 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील  'फ्री हिट वाला नो बॉल, झाला झोलझाल' हे गाणे रसिक प्रेक्षकांना ठेका धरायला लावण्यास आले आहे. हे गाणं गायिका वैशाली सामंत हिने स्वरबद्ध केलं असून वैशालीच्या या गाण्याने रसिक प्रेक्षक नक्कीच ठेका धरतील यात शंका नाही. 

देव कधीही चुकत नसतो, तो जादू करतो...बहुचर्चित 'अनन्या'चा टीझर प्रदर्शित

बहुचर्चित अनन्या (Ananya) हा सिनेमा आता 22 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) अनन्या हे पात्र साकारत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून हृता दुर्गुळे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर येणार सुधा मूर्ती

ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर येणार आहेत. 

'खतरों के खिलाडी'चे बारावे पर्व 2 जुलैपासून होणार सुरू; प्रोमो आऊट

रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक सीझनमध्ये प्रेक्षकांना साहसी खेळ पाहायला मिळत आहेत. आता 'खतरों के खिलाडी' हा प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचे शूटिंग पूर्ण झाले असून लवकरच छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. 

'आई कुठे काय करते' मालिकेने पार केला 700 भागांचा टप्पा

'आई कुठे काय करते' मालिकेने 700 भागांचा टप्पा पार केला आहे. स्टार प्रवाहच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन मालिकेच्या 700 व्या भागाबद्दल खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. 

‘धर्मवीर’ची यशोगाथा उलगडणार

Dharmaveer : ‘ठाण्याचा वाघ’ म्हणून ख्याती असलेले धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारलेला 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे'  (Dharmaveer Mukkam Post Thane) हा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा मराठी सिनेसृष्टीत ‘माईलस्टोन’ ठरतोय. आता हा सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांनी या सिनेमाला उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता 'धर्मवीर'ची यशोगाथा उलगडली जाणार आहे. 


Dharmaveer : ‘धर्मवीर’ची यशोगाथा उलगडणार; मुक्काम पोस्ट झी टॉकीज

क्रिमिनल जस्टिस'च्या तिसऱ्या सीझनचा टीझर रिलीज

ओटीटी विश्वात पंकज त्रिपाठीचे (Pankaj Tripathi) नाव महत्तवाचे मानले जाते. पंकजने अनेक लोकप्रिय वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. त्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. पंकजच्या एक वेबसीरिजचा सीझन संपल्यानंतर दुसरा सीझन येईपर्यंत प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागते. आता पंकजच्या 'क्रिमिनल जस्टिस' (Criminal Justice) या वेबसीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


Deepika Padukone : दीपिका पादुकोण रुग्णालयात दाखल

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

राज्य बालनाट्य स्पर्धा पार.. राज्य बालनाट्य स्पर्धा नुकतीच पार पडली आहे. या स्पर्धेत नागपूरच्या 'थेंब-थेंब श्वास'ला सात पुरस्कार मिळाले आहेत.

राज्य बालनाट्य स्पर्धा नुकतीच पार पडली आहे. या स्पर्धेत नागपूरच्या 'थेंब-थेंब श्वास'ला सात पुरस्कार मिळाले आहेत. 

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; नेहाच्या पहिल्या नवऱ्याची होणार एन्ट्री?

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. यश-नेहा नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. नेहा यशचा सुखी संसार नुकताच सुरू झाला आहे. अशातच मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. नेहा यशच्या सुखी संसारात नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री होणार असे म्हटले जात आहे. 

रिया चक्रवर्तीकडून सुशांत सिंह राजपूतसोबतचे खास फोटो शेअर

SSR Death Anniversary  : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) आज स्मृतिदिन आहे. त्याच्या स्मृतिदिनानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सुशांतसोतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं (Rhea Chakraborty) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुशांत आणि तिचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. 


पाहा पोस्ट:



फराह खाननं शेअर केला मजेशिर व्हिडीओ

फराह खाननं नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता विकी कौशल देखील दिसत आहे. 


पाहा व्हिडीओ:





ह्रतिकची जाहिरात करण्याची अनोखी पद्धत; बर्गर किंग कंपनीला म्हणाला...

Hrithik Roshan Burger King : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) त्याच्या नृत्यशैलीनं आणि हटके स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. ह्रतिक सध्या त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सध्या बर्गर किंग या कंपनीच्या जाहिरातीची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. बर्गर किंग कंपनीच्या जाहिरात करण्याच्या पद्धतीचं अनेकांनी कौतुक केलं आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

सलमानला धमकीचं पत्र देण्यामागे बिश्नोई गँगचा खंडणीचा हेतू: सूत्रांची माहिती

Salman Khan threat letter case : काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील लेखक सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमानला हे धमकीचं पत्र देण्यामागे बिश्नोई गँगचा खंडणीचा हेतू होता, अशी माहिती गृहविभागाच्या सूत्रांनी दिली आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

नुपूर शर्मांबाबतचं गौतम गंभीरचं ट्वीट चर्चेत; स्वरा भास्कर म्हणते....

Swara Bhasker : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker)  ही वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडत असते. स्वराच्या सोशल मीडियावर पोस्ट या नेहमी चर्चेत असतात. नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. अनेक सेलिब्रिटींनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याबद्दल एक ट्वीट शेअर केले होते. या ट्वीटवर आता स्वरा भास्करनं प्रतिक्रिया दिली आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

ब्रम्हास्त्रमधील मौनी रॉयचा लूक रिव्हील

ब्रम्हास्त्र चित्रपटामधील मौनी रॉयचा लूक रिव्हील करण्यात आला आहे. 


पाहा लूक 





गोविंदानं भाच्याला केलं माफ

Krushna Abhishek, Govinda : अभिनेता गोविंदा (Govinda) आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) यांच्यामध्ये गेली काही वर्ष वाद सुरु होते, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली होती. मामा आणि भाच्याच्या या जोडीमध्ये सुरु असलेला वाद आता मिटला आहे, असं म्हटलं जाऊ शकतं कारण  मनीष पॉलच्या पॉडकास्ट शोमध्ये कृष्णानं गोविंदाची माफी मागितली होती. आता काही दिवसांपूर्वी गोविंदानं देखील याचं पॉडकास्टमध्ये हजेरी लावून कृष्णाला माफ केल्याबद्दल सांगितलं आहे. मनिष पॉलनं नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मनिष हा गोविंदाला कृष्णानं मागितलेल्या माफीबद्दल सांगतो. 


वाचा सविस्तर बातमी 

इंजिनिअर ते अभिनेता, सुशांत सिंह राजपूतचा जीवनप्रवास

Sushant Singh : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) आज (14 जून)  दुसरी पुण्यतिथी आहे. 21 जानेवारी 1986 रोजी सुशांतचा जन्म झाला. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सुशांतच्या निधनानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. जाणून घेऊयात सुशांत सिंह राजपूतच्या जीवनप्रवासाबद्दल...

क्रिकेटर वॉशिंग्टन सुंदरकडून भन्नाट व्हिडीओ शेअर

Vikram : प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. पुष्पा चित्रपटातील गाणी आणि डायलॉग खूप प्रसिद्ध झाली. या चित्रपटातील एवढी क्रेझ होती की, अनेक सेलिब्रिटी आणि खेळाडू  या चित्रपटातील गाण्यांवर तसेच डायलॉग्सवर व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर शेअर करत होते. आता पुष्पा चित्रपटाची क्रेझ कमी होऊन आता कमल हासन (Kamal Hasan) यांच्या विक्रम (Vikram) चित्रपटाची क्रेझ वाढली आहे.


वाचा सविस्तर 

'मूर्ती लहान किर्ती महान'; सलमान ते ए.आर. रहमान, सेलिब्रिटींना गाणं ऐकवणारा अब्दु रोजिक कोण?

Abdu Rozik : गेल्या काही दिवसांपासून अब्दु रोजिक  (Abdu Rozik)  नावाच्या एका व्यक्तीचा बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सलमान खानला (Salman Khan) मिठी मारताना दिसतो, तर  कधी तो सोनू सूद (Sonu Sood) आणि ए.आर रहमान (A. R. Rahman) यांना त्याची गाणी ऐकवून त्यांची मनं जिंकतो. अनेक सेलिब्रिटींनी अब्दु रोजिकनं गाणं गाऊन दाखवलं आहे. पण सध्या अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, अब्दु रोजिक कोण आहे? जाणून घेऊयात अब्दु याच्याबद्दल...


वाचा सविस्तर 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


R Madhavan : आर माधवनच्या 'रॉकेट्री' चित्रपटाचा ट्रेलर झळकला टाइम्स स्क्वेअरवर; व्हिडीओ व्हायरल


R Madhavan : बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेता  आर माधवनचा (R Madhavan) ‘रॉकेट्रीः द नंबी इफेक्ट’ (Rocketry) हे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचे कथानक भारतीय शास्त्रज्ञ नंबी नारायण (Nambir Narayan) यांच्या जीवनावर आधारित आहे. आर माधवन या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार असून तो या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर टाइम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर झळकला. 


बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट आता ओटीटीवर होणार रिलीज



Samrat Prithviraj On OTT :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar)  'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) हा चित्रपट  3 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. या चित्रपटाचं बजेट 200 कोटी होतं. पण चित्रपटानं मात्र जवळपास 65 कोटींची कमाई केली. आता बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या हा चित्रपट ओटीटी रिलीज करण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे. 


वाचा सविस्तर बातमी 


जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'विक्रम'ची जादू



Vikram box office day 10 collection : अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांचा विक्रम (Vikram) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कमल हसन यांच्यासोबतच विजय सेतुपती, शिवानी नारायण, फहाद फासिल आणि सुर्या या कलाकारांनी देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं आता जगभरातील बॉक्स ऑफिसवर  300 कोटींची कमाई केली आहे. 



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.