Jos Buttler on BCCI Rule : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावल्यानंतर बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी वेळेची मर्यादा घातली आहे. कर्णधार रोहित शर्मा स्वतः या निर्णयावर खूश दिसलेला नाही. दुसरीकडे,  भारताविरुद्धची टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंड कॅप्टन जोस बटलरची प्रतिक्रिया समोर आली आहे.


कुटुंबाच्या पाठिंब्याची गरज असते


इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर म्हणाला की, क्रिकेट मालिकेदरम्यान कुटुंबासोबत राहिल्याने खेळावर परिणाम होत नाही. ते म्हणाले, दीर्घ दौऱ्यावर स्वत:ला प्रेरित आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी कुटुंबाच्या पाठिंब्याची गरज असते. कोविड नंतर, आपल्या प्रियजनांना एकत्र ठेवणे आणि त्यांच्यासोबत राहणे अधिक महत्वाचे झाले आहे.


कुटुंबासोबत वेळ घालवणे महत्त्वाचे आहे


भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना 22 जानेवारीला होणार आहे. सामन्यापूर्वी बटलर म्हणाला, 'मला वाटते की हे खूप महत्त्वाचे आहे. आपण आधुनिक जगात राहतो आणि अशा वेळी कुटुंबानेही एकत्र असायला हवे, जेणेकरून आपण आपले दु:ख आणि आनंद कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करू शकू.


क्रिकेटमध्ये बराच वेळ घालवला जातो


बटलर पुढे म्हणाला की, 'खेळाडू म्हणून क्रिकेटच्या मैदानावर बराच वेळ घालवला जातो. खेळाडू दीर्घकाळ घरापासून दूर राहतात. कोविडपासून, कुटुंबासोबत वेळ घालवणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. कुटुंबासोबत राहण्याचा खेळावर वाईट परिणाम होतो असे मला अजिबात वाटत नाही. लांबच्या प्रवासात कुटुंबाचे व्यवस्थापन करता येईल. मला वाटते की, इतर देशांमध्ये दीर्घकाळ क्रिकेट खेळताना खेळाडूंना मानसिक त्रास होऊ लागतो. विशेषतः जेव्हा निकाल आपल्या बाजूने नसतो, अशा परिस्थितीत आपण आपला वेळ कुटुंबातील सदस्यासोबत घालवणे महत्त्वाचे असते.


बीसीसीआयने कौटुंबिक नियम कडक केले


न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका 3-0 आणि ऑस्ट्रेलिया 3-1 ने गमावल्यानंतर, बीसीसीआयने खेळाडूंबाबत 10 नियम केले. यापैकी एक नियम कुटुंबाशी संबंधित होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की 45 दिवसांपेक्षा जास्त दौऱ्यांवर कुटुंबातील सदस्य फक्त 2 आठवडे खेळाडूंसोबत राहू शकतील. एवढेच नाही तर खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचीही परवानगी घ्यावी लागणार आहे.


बटलर म्हणाला, चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी खराब होणार नाही


बटलरनेही सामन्यापूर्वी सांगितले की, 'टी-20 मालिकेमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची तयारी बिघडणार नाही. मला सामन्याच्या वेळापत्रकाची चिंता नाही, मी फक्त सामना खेळण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. टी-20 मालिका खूपच रोमांचक असेल. त्यानंतर एकदिवसीय सामनेही होतील, त्यामध्ये खेळण्यासाठी मी उत्सुक आहे.


इतर महत्वाच्या बातम्या