Walmik Karad Property: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्या आणि त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे पुण्यात (Pune) अनेक ठिकाणी कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे.


वाल्मिक कराडची पहिली पत्नी मंजीरीपेक्षा दुसरी पत्नी असणाऱ्या ज्योती जाधवच्या नावे अधिक संपत्ती असल्याचे दिसत आहे. वाल्मिक कराडची पहिली पत्नी मंजीरीच्या नावे सव्वाचार कोटी रुपयांची मालमत्ता, तर दुसरी पत्नी ज्योतीच्या नावे साडेसतरा कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आली आहे. अशाप्रकारे दोन्ही पत्नींच्या नावे मिळून पावने बावीस कोटी रुपयांची मालमत्ता आतापर्यंत असल्याचं समोर आलं आहे.


वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे कोट्यावधींची संपत्ती-


पहिली पत्नी मंजीरी -


- पहिली पत्नी मंजीरी आणि वाल्मिकच्या स्वतःच्या नावे पिंपरी - चिंचवडच्या काळेवाडीत 4 BHK फ्लॅट - अंदाजे किंमत - सव्वा तीन कोटी.
- पहिली पत्नी मंजीरी आणि वाल्मिकच्या स्वतःच्या नावे पिंपरी - चिंचवडच्या वाकडमधे टु बी एच के - अंदाजे किंमत एक कोटी.


वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव-


- वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत दोन ऑफीस स्पेसेस - अंदाजे किंमत - अंदाजे बारा कोटी
- वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यातील हडपसरमधील एमनोरा टाऊनशीपमधे एक फ्लऍट - किंमत अंदाजे दिड कोटी रुपये.
- वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे खराडी मधील गेरा ग्रीन्सव्हीला सोसायटीत एक फ्लॅट - किंमत अंदाजे - पावशे दोन कोटी रुपये.
- दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे सोलापुर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेंद्रे गावात 35 एकर जमीन. किंमत अंदाजे दीड कोटी रुपये.
- दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा इथे नउ एकर जमीन. किंमत अंदाजे सत्त्यात्तर लाख रुपये.


बीडच्या मांजरसुंबा येथे वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे 9 एक्कर जमीन


खंडणी हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड च्या दुसऱ्या पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर बीडच्या मांजरसुंबा परिसरात 9 एकर जमीन आहे. इतकेच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.


वाल्मिक कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा, CCTV मध्ये मारेकरी-पोलीस एकत्र दिसले, VIDEO: 



संबंधित बातमी:


Walmik Karad Jyoti Jadhav: वाल्मिक कराडचा आणखी एक प्रताप समोर; ज्योती जाधवच्या नावानं मांजरसुंब्यात मोठं घबाड