एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 12 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 12 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

देबिना आणि गुरमीत दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

अभिनेता  गुरमीत चौधरी (Gurmeet Chaudhary) आणि अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. गुरमीत आणि देबीना यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. देबिनाने यावर्षी 3 एप्रिल रोजी पहिल्या मुलीला जन्म दिला. या मुलीचं नाव त्यांनी लियाना ठेवलं. आता देबिना दुसऱ्यांदा आई झाली आहे. देबिना आणि गुरमीत यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या घरी आलेल्या चिमुकलीचं स्वागत केलं आहे. 

अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं निधन

अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं (Siddhaanth Vir Surryavanshi) निधन झाला आहे. सिद्धांतनं वयाच्या 46 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जीममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जवळपास 45 मिनिटे सिद्धांत वीर सूर्यवंशीवर रुग्णालयात करण्यात आले. पण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

ड्रेकच्या कॉन्सर्टमध्ये लतादीदींचं गाणं

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या गाण्यांना देशातीलच नाही तरी परदेशातील देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. लतादीदींच्या गाण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media)  व्हायरल होतात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये लतादीदींच्या 'दीदी तेरा देवर दिवाना' या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन ऐकायला येत आहे.

मराठी रुपेरी पडद्यावर ‘फतवा’ चित्रपटाचा म्युझिक अनावरण सोहळा संपन्न

वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी चित्रपट सध्या लक्षवेधी ठरतायेत. गोष्टी नामंजूर असल्या की त्याविरोधात फतवा काढून निषेध नोंदवला जातो. फतव्याच्या वेगवेगळया बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो. पण आता ‘फतवा’ हे शीर्षक असणारा मराठी चित्रपट रुपेरी पडद्यावर येऊ घातला आहे. या चित्रपटाचा दिमाखदार म्युझिक अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. चित्रपटाचा टीझरही याप्रसंगी प्रदर्शित करण्यात आला. ब्ल्यु लाईन फिल्मस् प्रस्तुत आणि प्रतिक गौतम दिग्दर्शित ‘फतवा’ चित्रपट 9 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगत ही नवी जोडी ‘फतवा’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडदयावर येते आहे. या दोघांसोबत छाया कदम, मिलिंद शिंदे, नागेश भोसले, संजय खापरे,अमोल चौधरी, निलेश वैरागर, पूनम कांबळे, निखिल निकाळजे, निकिता संजय हे कलाकार ‘फतवा’मध्ये दिसणार आहेत. डॉ.यशवंत, प्रेमा निकाळजे, अनुराधा पवार यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे.

13:54 PM (IST)  •  12 Nov 2022

Shah Rukh Khan : शाहरुख खानला मिळाला 'ग्लोबल आयकॉन' अवॉर्ड

Shah Rukh Khan Award : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी 'पठाण' सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा पुढल्या वर्षी जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच किंग खानला दुबईत 'ग्लोबल आयकॉन ऑफ सिनेमा अँड कल्चरल नॅरेटिव्ह अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले आहे. 

12:43 PM (IST)  •  12 Nov 2022

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर छोटे हास्यवीर उडवणार विनोदाचे तुफानी बार!

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या विनोदी कार्यक्रमाचे जगभरात चाहते आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नेहमी निरनिराळ्या प्रकारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात वेगळेपण  येणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त छोटे हास्यवीर प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

12:13 PM (IST)  •  12 Nov 2022

Jivachi Hotiya Kahili : 'जिवाची होतिया काहिली' मालिकेचे 100 भाग पूर्ण

Jivachi Hotiya Kahili : 'जिवाची होतिया काहिली' या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे. मराठी भाषिक आणि कानडी भाषिक यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत  कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवलकर हिचा कानडी अंदाजसुद्धा  प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. मालिका आता वेगळ्या वळणावर पोचली आहे. अशातच आता या मालिकेचे 100 भाग पूर्ण झाले आहेत. 

11:48 AM (IST)  •  12 Nov 2022

Kangana Ranaut : कंगना रनौतवर ट्विटरनंतर आता इंस्टाग्रामवर बंदी?

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना कनौत (kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा तिच्यावर टीका केली जाते. आता पंगाक्वीन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ट्वीटवर बंदी घातलेली असताना कंगनाने आता इंस्टाग्रामवर पंगा घेतला आहे. तिने इंस्टाग्रामला फालतू म्हटलं आहे.

10:45 AM (IST)  •  12 Nov 2022

Sonali Bendre : सोनाली बेंद्रेच्या सुखी संसाराला 20 वर्ष पूर्ण

Sonali Bendre : आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सोनाली बेंद्रेच्या (Sonali Bendre) नावाचा समावेश आहे. सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बहलच्या सुखी संसाराला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. सोनालीने गोल्डीसोबतचे खास फोटो शेअर चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaZero Hour Ratan Tata:रतन टाटांच्या 'नॅनो' कारची गोष्ट... Dr Raghunath Mashelkarयांनी सांगितला किस्साMumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरीZero Hour Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न द्या, राज्य सरकारची केंद्राला विनंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Embed widget