एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 12 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 12 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

MS Dhoni : धोनीचे चित्रपट निर्मितीत पदार्पण, पहिल्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

MS Dhoni Reveals First Look of His Production House Debut Film Let's Get Married aka LGM : भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी याने आता मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलेय. धोनीने दाक्षिणात्य चित्रपटाची निर्मिती केली आहे. धोनी एलजीएम या आपल्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शीत केलेय. धोनी एंटरटेनमेंट प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे. जानेवारी 2023 मध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आता या चित्रपटाचे पोस्टर रिलिज झालेय. 

Deepika Padukone's Selfie: दीपिकाची कुटुंबासोबत भूतान ट्रिप

Deepika Padukone's Selfie: अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही काही दिवसांपूर्वी भूतान (Bhutan) येथे ट्रीपला गेली होती.तिने भूतानमधील अनेक ठिकाणांना भेट दिली. दीपिका भूतान येथे तिच्या कुटुंबासोबत ट्रीपला गेली होती, असं म्हटलं जात आहे. दीपिकानं भूतानमधील  तिच्या चाहत्यांसोबत फोटो देखील काढले. दीपिकाचे भूतानमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिका उत्कंठावर्धक वळणावर

Thipkyanchi Rangoli Marathi Serial Latest Update : 'ठिपक्यांची रांगोळी' (Thipkyanchi Rangoli) ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत सध्या अप्पू आणि प्राचीची परीक्षा सुरू असल्याचं दिसत आहे. आता या मालिकेच्या आगामी भागात अप्पूला परीक्षा न देता यावी यासाठी प्राची खास प्लॅन बनवणार आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सुमी-कुकी आणि अपर्णा अमेयबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. तर दुसरीकडे अमेय घरी असल्यामुळे मानसी खूप दिवसांनी आनंदी दिसणार आहे. पण तरीही 'त्या' रात्री अमेय नक्की कुठे होता याचा संशय अपर्णा घेत आहेत. तर कुकी आणि सुमी मात्र अमेयवर विश्वास दाखवत आहेत. अमेय आणि मानसीमधल्या मतभेदांना अप्पू आणि शशांक जबाबदार असल्याचं अपर्णाचं मत आहे. 

Allu Arjun : अल्लू अर्जुनची बॉलिवूडमध्ये एन्ट्री?

Allu Arjun Completes Jawan Shoot : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) या सिनेमाने जगभरातील सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे. आता त्याचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. सध्या शाहरुख या सिनेमाचं शूटिंग करत आहे. आता या सिनेमासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. किंग खानच्या या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची (Allu Arjun) एन्ट्री झाल्याचे म्हटले जात आहे. 

16:43 PM (IST)  •  12 Apr 2023

Armaan Malik Gym Fees: युट्यूबर अरमान मलिकची नवी जिम; एका महिन्याची फी ऐकून व्हाल थक्क!

 Armaan Malik Gym Fees: प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.   पायल आणि कृतिका  या अरमानच्या दोन पत्नी आहेत.काही दिवसांपूर्वी अरमानची दुसरी पत्नी कृतिकानं एका गोंडस बाळाला जन्म दिला. अरमानची पहिली पत्नी पायल देखील लवकरच आई होणार आहे.अरमान हा त्याच्या व्लॉगमधून त्याच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घडामोडींची माहिती चाहत्यांना देतो. नुकत्याच एका  व्लॉगमध्ये अरमाननं त्याच्या नव्या जिमची माहिती दिली. या जिमची एका महिन्याची फी देखील अरमाननं या व्लॉगमध्ये सांगितली आहे. 

15:11 PM (IST)  •  12 Apr 2023

Salman Khan : सलमान खानच्या 'किसी का भाई किसी जान'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात!

Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Advance Booking : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. ईदच्या मुहूर्तावर त्याचा आगामी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आता या सिनेमाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगलादेखील सुरुवात झाली आहे. 

15:04 PM (IST)  •  12 Apr 2023

Hema Malini: लग्झरी कार सोडून हेमा मालिनी यांनी मुंबई मेट्रो आणि रिक्षामधून केला प्रवास; प्रवासादरम्यानचा अनुभव केला शेअर

Hema Malini Travel In Mumbai Metro:  मुंबईमध्ये (Mumbai) ट्रॅफिकचा सामना अनेकांना करावा लागतो.  अशा परिस्थितीत या ट्रॅफिक जॅमच्या त्रासातून सुटका करण्यासाठी लोक मेट्रोमधून प्रवास करण्याचा पर्याय  निवडतात. मुंबईमधील ट्रॅफिक टाळण्यासाठी अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini)  यांनी देखील मेट्रोमधून आणि रिक्षामधून प्रवास केला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन हेमा मालिनी यानी मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना आलेला अनुभव सांगितला. 

13:53 PM (IST)  •  12 Apr 2023

Mi Honar Superstar Jallosh Juniorscha: ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’मध्ये प्रथम बोरसेचा परफॉर्मन्स पाहू अंकुश चौधरी झाला भावूक; पाहा व्हिडीओ

Mi Honar Superstar Jallosh Juniorscha: मराठी चित्रपटसृष्टीती प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary) हा त्याच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकतो. अंकुशनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चाळीतील सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अभिनयाचा श्रीगणेशा करत अंकुशने नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली. म्हणता म्हणता प्रेक्षकांचा अंकुश हा लाडका अभिनेता सुपरस्टार झाला. अंकुशचा  प्रेरणादायी प्रवास ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या (Mi Honar Superstar Jallosh Juniorscha) बच्चेकंपनीने आपल्या नृत्यातून सादर केला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

13:20 PM (IST)  •  12 Apr 2023

Anant Ambani Radhika Merchant : अनंत अंबानीने राधिका मर्चंटसोबत दुबईत केलं बर्थडे सेलिब्रेशन

Anant Ambani Birthday Bash With Radhika Merchant : देशातील सर्वात मोठे उद्योगपती म्हणून अंबानी (Ambani) यांची ओळख आहे. नुकताच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा (NMACC) शाही उद्धाटन सोहळा पार पडला. आता अनंत अंबानीने (Anant Ambani) राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) दुबईत (Dubai) बर्थडे सेलिब्रेशन केलं आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget