Entertainment News Live Updates 10 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Jul 2022 05:41 PM
Bali : स्वप्नील जोशीच्या 'बळी'च्या होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर; हॉरर, थ्रिलर सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता

Bali : 'पावनखिंड', 'झिम्मा', 'कारखानीसांची वारी', 'स्टेपनी' नंतर आता 'बळी' (Bali) या सिनेमाचा आता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. रविवारी 17 जुलैला  दुपारी एक वाजता हा सिनेमा प्रेक्षकांना प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि पूजा सावंत (Pooja Sawant) मुख्य भूमिकेत आहे. 

Myra Vaikul : 'जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल'; 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीने आषाढी एकादशीनिमित्त शेअर केला खास व्हिडीओ

आज महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दोन वर्षांनंतर आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जात आहे. आषाढी एकादशीनिमित्त अनेक कलाकार चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परी अर्थात मायरा वैकुळनेदेखील (Myra Vaikul) आषाढी एकादशीनिमित्त एक खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 





Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2'चे बॉक्स ऑफिसवर 50 दिवस पूर्ण; लवकरच पार करणार 250 कोटींचा टप्पा

Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा 20 मे रोजी सिनेमागृहात रिलीज झाला असून सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. ओटीटीवर हा सिनेमा रिलीज झाला असला तरी बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 50 दिवस पूर्ण केले आहेत. 

Ranveer vs Wild: दीपिकासाठी फुल आणायला निघालेल्या रणवीरला अश्रू झाले अनावर; बेयर ग्रील्सनं दिलं प्रोत्साहन

Ranveer Singh vs Wild with Bear Grylls : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा रणवीर वर्सेज वाइल्ड (Ranveer vs Wild) या शोमुळे सध्या चर्चेत आहे. शुक्रवारी (8 जुलै) या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. या एपिसोडमध्ये रणवीर हा भावूक झालेला दिसत आहे.  'रणवीर वर्सेज वाइल्ड' या कार्यक्रमाचा होस्ट बेयर ग्रील्सनं (Bear Grylls) रणवीर प्रोत्साहन दिलं. 


वाचा सविस्तर बातमी

Mangesh Desai : मंगेश देसाईच्या कारला अपघात; गाडीचे नुकसान

मंगेश देसाई कुटुंबासोबत कर्जत येथे जात असताताना वाशी, कोकण भवन परिसरात कारचा अपघात झाला आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. परंतु गाडीचे नुकसान झाले आहे. गाडीचे नुकसान झाल्याने मंगेश देसाईला आर्थिक फटका बसला आहे. 

The Ghost Teaser : नागार्जुनच्या ‘द घोस्ट’ चित्रपटाचा टीझर रिलीज, व्हिडीओ पाहून प्रेक्षकही झाले स्तब्ध!

Nagarjuna Movie The Ghost Teaser: साऊथ सुपरस्टार नागार्जुनच्या (Nagarjuna Akkineni) आगामी चित्रपट 'द घोस्ट'चा (The Ghost) टीझर रिलीज झाला आहे. 'द घोस्ट'च्या टीझरमध्ये अभिनेता नागार्जुन एका खतरनाक अवतारात दिसत आहे. या चित्रपटात नागार्जुनचा अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. यासोबतच निर्मात्यांनी नागार्जुनचा या चित्रपटातील लूकही शेअर केला आहे. नागार्जुनच्या 'द घोस्ट' चित्रपटाचा हा टीझर व्हिडीओ सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. चित्रपटाचा टीझर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीझरमध्ये नागार्जुनची स्टाईल आणि थरारक अॅक्शन सीन्सची झलक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.


वाचा संपूर्ण बातमी

Riteish Deshmukh : 'पांडुरंगाच्या साक्षीनं मी...'; आषाढी एकादशीनिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट

Riteish Deshmukh : मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळतो. रितेशनं हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. लय भारी, माऊली या रितेशच्या मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली. आता रितेश दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रितेशनं दिग्दर्शित केलेला वेड (ved) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज आषाढी एकादशीनिमित्त एक खास पोस्ट शेअर करुन रितेशनं या चित्रपाटबद्दल माहिती दिली आहे. 


वाचा सविस्तर बातमी

De Dhakka 2 : ‘आज पंढरीची वारी, 5 ऑगस्टला लंडनवर स्वारी!’, ‘दे धक्का 2’चं नवं पोस्टर पाहिलंत का?

De Dhakka 2 New Poster : आज संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशी निमित्ताने विठुरायाची पूजा केली जात आहे. तर, पंढरपुरातही पायी चालत आलेले वारकरी आज विठुरायाचे दर्शन घेत आहेत. याचा खास दिवसाचं निमित्त साधून आज (10 जुलै) ‘दे धक्का 2’ (De Dhakka 2) या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यंदा ही गाडी धक्के खात थेट लंडनची वारी करणार असल्याने प्रत्येकाचा मॉर्डन अवतार पाहायला मिळतो आहे. या पोस्टरमध्ये अभिनेते प्रवीण तरडे देखील दिसत असल्याने, चित्रपटात त्यांची देखील महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. हे पोस्टर पाहून आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.


वाचा संपूर्ण बातमी


 

कॉफी विथ करणमध्ये आमिर येणार पण शाहरुख नाही; करणनं सांगितलं कारण

Koffee With Karan 7 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक असलेल्या करण जोहरच्या (Karan Johar)  कॉफी विद करण (Koffee With Karan) या कार्यक्रमाच्या सातव्या सिझनला सुरुवात झाली आहे. या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्टनं (Alia Bhatt) हजेरी लावली होती. रणवीर आणि आलियानं या पहिल्या एपिसोडमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि करिअरबाबत चर्चे केली. या एपिसोडला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण कॉफी विथ करणच्या या सिझनध्ये अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हजेरी लावणार नाही. याबाबत करण जोहरनं माहिती दिली आहे.  


वाचा सविस्तर बातमी 

Alia Bhatt : हॉलिवूडचं शूटिंग आटोपून आलिया भारतात परतली! एअरपोर्टवर रणबीरला पाहून म्हणाली....

Alia Bhatt : 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग आटोपून आलिया भट्ट (Alia Bhatt) रविवारी मुंबईत परतली आहे. आलियाला घेण्यासाठी तिचा पती-अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) विमानतळावर गेला होता. रणबीर कपूर विमानतळाबाहेर कारमध्ये तिची वाट पाहत होता. आलिया भट्ट लवकरच आई होणार असून, खूप दिवसांच्या दुराव्यानंतर पती रणबीर कपूरला भेटण्यासाठी ती खूप उत्सुक दिसत होती. आलिया भट्ट जेव्हा विमानतळावरून बाहेर पडत होती तेव्हा तिची नजर फक्त रणबीर कपूरला शोधत होती. रणबीर दिसताच तिने त्याला मिठी मारली.


वाचा संपूर्ण बातमी

Kubbra Sait : 'बॉलिवूडमध्ये अनेक राक्षस'; कुब्रा सैतला लोकांनी दिला होता सल्ला

Kubbra Sait :  सेक्रेड गेम्स (Sacred Games) या वेब सीरिजमधून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री कुब्रा सैत (Kubbra Sait) ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या विषयांवर मतं ती सोशल मीडियावर मांडत असते. तसेच वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ देखील कुब्रा सोशल मीडियावर शेअर करते.  'ओपन बुक: नॉट क्वाइट अ मेमोयर' हे कुब्राचं पुस्तक लाँच झालं आहे. एका मुलाखतीमध्ये कुब्रानं बॉलिवूडबाबत सांगितलं. 


वाचा सविस्तर बातमी

कधीकाळी केलेय रोमँटिक अभिनेत्याचे काम, ‘या’ चित्रपटामुळे आलोक नाथना मिळाला ‘संस्कारी बाबूजी’ टॅग!

Alok Nath Birthday : बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये संस्कारी बाबूजींची भुमिका साकारणारे अभिनेते आलोक नाथ (Alok Nath) यांचा आज (10 जुलै) वाढदिवस आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. आपल्या अभिनयाने त्यांनी अनेक पात्रांना पडद्यावर अक्षरशः जिवंत केले. आलोक नाथ यांचा जन्म बिहारच्या खगाडीया जिल्ह्यात झाला होता. बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आलोक नाथ यांचा जन्म एका अशा कुटुंबात झाला होता, ज्यांना मनोरंजन विश्वाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. कॉलेजमध्ये असताना त्यांना अभिनयाची गोडी लागली. यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. इथे त्यांनी 3 वर्ष अभिनयाचे शिक्षण घेतले. दूरदर्शनच्या ‘रिश्ते नाते’ या मालिकेमधून त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती.


वाचा संपूर्ण बातमी

मैत्री, प्रेम आणि तब्बल 12 वर्ष डेटिंग! अखेर लग्नबंधनात अडकले पायल रोहतगी-संग्राम सिंह

Payal Sangram Wedding : अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) आणि संग्राम सिंह (Sangram Singh) अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. आग्र्यात त्यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. गेल्या 12 वर्षापासून दोघे एकमेकांना डेट करत होते. अखेर एका तपानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि विवाह बंधनात अडकले. नुकताच हा विवाहसोहळा पार पडला असून, त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड शेअर केले जात आहेत. या फोटोंमध्ये दोघेही आपल्या नात्यात एक पाऊल पुढे गेल्याबद्दल आनंदी दिसत आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


मुख्यमंत्र्याकडून रंगभूषा कलाकाराच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत, मंगेश देसाईंनी घेतला पुढाकार!


‘धर्मवीर’ चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाई यांनी त्यांच्यातल्या संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं आहे. आर्थिक अडचणींमुळे आपल्या मुलावर वैद्यकीय उपचार करू न शकणाऱ्या रंगभूषा कलाकाराला आर्थिक मदत त्यांनी केली. विशेष म्हणजे, ही आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रंगभूषा कलावंत विजय हर्णे यांच्या आजारी मुलाला रुग्णालयात दाखल करावे लागले.


'नाम घ्यावं विठ्ठल' या गाण्याद्वारे विठुरायाला भावनिक साद


दोन वर्षांच्या ब्रेकनंतर यंदा आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरला पायी वारी करत निघाले आहेत. डोळ्यांचं पारणं फिटवणारा हा रम्य सोहळा संगीतकार व गायक श्रीजीत गायकवाड 'नाम घ्यावं विठ्ठल' या गाण्यामार्फत मांडणार आहे. आषाढी एकादशीचं औचित्य साधत हे गाणं त्याने नुकतचं प्रदर्शित केलं आहे. शिवाय हे गाणं त्याने स्वत: गायले असून, संगीतसुद्धा त्यानेच केले आहे. या गाण्याला गणपत कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केले असून, गाण्याचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे.


'मला पांडुरंग असा भेटला', अभिनेता स्वप्नील जोशीची पंढरपूर पायी वारी!


महाराष्ट्रात सध्या सर्वत्र आषाढी ए्कादशीचा माहोल आहे. माऊली माऊलीच्या गजरात प्रत्येक जण या वारीमध्ये सहभागी होत विठुरायाच्या भेटीत रंगून गेले आहेत. प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी यानेही वाखरी ते पंढरपूर अशी पायी वारी करत आपल्या अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला प्रारंभ केला. ‘वारीचा हा प्रवास प्रत्येकाने एकदा तरी करावाच.. तुम्ही वारी चालला नाहीत, तर तुम्ही जिवंत न्हाईत!’, असे माझी आजी म्हणायची. ती असे का म्हणायची त्याची अनुभूती मला काल झाली. काल वारकऱ्यांना भेटून, त्यांच्या बरोबर चालून, खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत मंदिर कधी आलं ते कळलंच नाही, अशा शब्दात स्वप्नीलने आपला अनुभव कथन केला.


'तारक मेहता' मालिकेच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी; निर्मात्यांना मिळाली नवी दयाबेन


‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. गेल्या काही दिनवसांपासून हा शो चर्चेत आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील अनेक कलाकारांनी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री दिशा वकानीनंदेखील ही मालिका सोडली. दिशा या मालिकेमध्ये दयाबेन ही भूमिका साकारत होती. आता दयाबेन ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार आहे? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. आता लवकरच दिशा वकानी यांना एक अभिनेत्री रिप्लेस करणार आहे.


'कॉफी विथ करण 7'चा असाही विक्रम; पहिल्याच भागाला मिळाले सर्वाधिक व्ह्यूज


सिने-निर्माता करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाचे सहा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आता सातव्या सीझनचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या भागाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड केला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.