Kubbra Sait : 'बॉलिवूडमध्ये अनेक राक्षस'; कुब्रा सैतला लोकांनी दिला होता सल्ला
एका मुलाखतीमध्ये कुब्रानं (Kubbra Sait) बॉलिवूडबाबत सांगितलं.
![Kubbra Sait : 'बॉलिवूडमध्ये अनेक राक्षस'; कुब्रा सैतला लोकांनी दिला होता सल्ला kubbra sait say about bollywood she was told industry is full of monsters Kubbra Sait : 'बॉलिवूडमध्ये अनेक राक्षस'; कुब्रा सैतला लोकांनी दिला होता सल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/58be0a25302645c0aa7cb37b89d722871657423367_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kubbra Sait : सेक्रेड गेम्स (Sacred Games) या वेब सीरिजमधून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री कुब्रा सैत (Kubbra Sait) ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या विषयांवर मतं ती सोशल मीडियावर मांडत असते. तसेच वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ देखील कुब्रा सोशल मीडियावर शेअर करते. 'ओपन बुक: नॉट क्वाइट अ मेमोयर' हे कुब्राचं पुस्तक लाँच झालं आहे. एका मुलाखतीमध्ये कुब्रानं बॉलिवूडबाबत सांगितलं.
कुब्राला लोकांनी दिला होता सल्ला
कुब्रा सैतने एका मुलाखतीदरम्यान इंडस्ट्रीतील तिचे सुरुवातीच्या दिवसांबाबत सांगितले. तेव्हा लोक बॉलिवूडबद्दल नकारात्मक गोष्टी सांगत होते. तिनं सांगितलं की, तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये लोकांनी तिला सांगितलं होतं की बॉलीवूड हे काम करण्यासाठी सर्वात वाईट ठिकाण आहे. बॉलिवूड हे राक्षसांनी भरलेलं आहे. जेव्हा ती इंडस्ट्रीत नवीन होती, तेव्हा लोकांनी तिला बॅग पॅक करून तिथून परत जाण्याचा सल्ला देखील दिला होता.
बॉलिवूडबाबत कुब्रा म्हणाली...
कुब्रा सैतनं पुढे सांगितसं की, मागे वळून पाहिल्यानंतर असं वाटतं की ती यापेक्षा श्रेष्ठ क्षेत्रात ती काम करु शकली नसती. 'हे ठिकाण तुम्हाला चांगल्या कथा लोकांपर्यंत पोहोचवण्याची आणि इतरांचे जीवन जगण्याची संधी देते. त्याचबरोबर लोक तुम्हाल ओळखतात.', असंही कुब्रानं सांगितलं. कुब्राचं लाइफ इस नॉटअ फेयरीटेल नावाचे पुस्तक देखील लिहिले आहे. कुब्राला सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या सीरिजमध्ये तिनं कुकू ही भूमिका साकारली होती. या सीरिजमध्ये कुब्रासोबतच अभिनेता वाजुद्दीन सिद्दीकीनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. 'रेड्डी', 'सुल्तान', 'सिटी ऑफ लाइफ' या चित्रपटांमध्ये कुब्रानं काम केलं.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)