Alia Bhatt : हॉलिवूडचं शूटिंग आटोपून आलिया भारतात परतली! एअरपोर्टवर रणबीरला पाहून म्हणाली....
Alia Bhatt : 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग आटोपून आलिया भट्ट (Alia Bhatt) रविवारी मुंबईत परतली आहे.
Alia Bhatt : 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग आटोपून आलिया भट्ट (Alia Bhatt) रविवारी मुंबईत परतली आहे. आलियाला घेण्यासाठी तिचा पती-अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) विमानतळावर गेला होता. रणबीर कपूर विमानतळाबाहेर कारमध्ये तिची वाट पाहत होता. आलिया भट्ट लवकरच आई होणार असून, खूप दिवसांच्या दुराव्यानंतर पती रणबीर कपूरला भेटण्यासाठी ती खूप उत्सुक दिसत होती. आलिया भट्ट जेव्हा विमानतळावरून बाहेर पडत होती तेव्हा तिची नजर फक्त रणबीर कपूरला शोधत होती. रणबीर दिसताच तिने त्याला मिठी मारली.
कारमध्ये बसलेल्या रणबीर कपूरला पाहून आलियाला प्रचंड आनंद झाला होता आणि तिने त्याच्याकडे पाहून जोरात 'बेबी' असा आवाज दिला. रणबीरकडे जात तिने त्याला कडकडून मिठी मारली. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर या वर्षी लग्न केले आहे. लवकरच ते दोघे आई-बाबा बनणार आहेत. सेलिब्रेटी फोटोग्राफार विरल भयानी यांनी जहा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ :
आलियाचा 'हार्ट ऑफ स्टोन' (Heart Of Stone) हा हॉलिवूड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच आलियाने या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये पूर्ण केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. आलियाने 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आलियाचा 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात आलियासह हॉलिवूड अभिनेत्री गैल गेडोट आणि जेमी डोर्ननदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा टॉम हार्परने सांभाळली आहे.
आलियाचे आगामी चित्रपट
'हार्ट ऑफ स्टोन' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला, तर या चित्रपटाचा सीक्वेलही प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. या सीक्वेलमध्येही आलिया मुख्य भूमिकेत दिसेल. आलिया आणि रणबीर कपूरचा 'ब्रम्हास्त्र' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, रणवीर सिंहसोबतचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'डार्लिंग्स' हे चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत.
संबंधित बातम्या