![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Riteish Deshmukh : 'पांडुरंगाच्या साक्षीनं मी...'; आषाढी एकादशीनिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट
रितेशनं दिग्दर्शित केलेला वेड (ved) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
![Riteish Deshmukh : 'पांडुरंगाच्या साक्षीनं मी...'; आषाढी एकादशीनिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट Riteish Deshmukh share photo with Salman Khan tell about movie ved Riteish Deshmukh : 'पांडुरंगाच्या साक्षीनं मी...'; आषाढी एकादशीनिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/c2b33d8cd28608fc2a1d6c4064473dec1657439318_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Riteish Deshmukh : मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळतो. रितेशनं हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. लय भारी, माऊली या रितेशच्या मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली. आता रितेश दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रितेशनं दिग्दर्शित केलेला वेड (ved) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज आषाढी एकादशीनिमित्त एक खास पोस्ट शेअर करुन रितेशनं या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.
रितेशनं बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सलमान आणि रितेश हे शूटिंग करताना दिसत आहेत. या फोटोला रितेशनं खास कॅप्शन देखील दिलं आहे.
रितेश देशमुखनं दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण
सलमान खानसोबतचे फोटो शेअर करुन रितेशनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पांडुरंगाच्या साक्षीने मी मराठी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज त्याच विठूमाऊलीच्या आषाढीला सांगतांना अतिशय आनंद होतोय की मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे .'
वेड चित्रपटामध्ये सलमान खान करणार काम
'अनेक अडचणीतून मार्ग काढत मी आणि माझ्या टीमने पहिला टप्पा यशस्वीपणे गाठला आहे आणि आता पुढचा पूर्णत्वाचा प्रवास आणखी बरंच शिकवणारा असणार आहे पण जर तुमच्या पाठीशी तुमची जिवाभावाची माणसं असतील तर हा प्रवास आणखी सोपा होतो. अशाच एका जिवाभावाच्या माणसाची साथ आमच्या चित्रपटाला लाभली ते म्हणजे ‘सलमान भाऊ’. माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊंनी लईभारी साथ दिली होती आता भाऊने माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटात आणखी एक वेड केलंय. थॅक्यु भाऊ. लव यू. तुम्हा सर्वांच्या सदिच्छांमुळे वेड पूर्ण झाला आहे . आणि आता… वेडेपणा सुरु होणार आहे. तेव्हा भेटूया लवकरच...', असंही रितेशनं कॅप्शनमध्ये लिहिलं.
पाहा रितेशची पोस्ट:
View this post on Instagram
हेही वाचा:
- The Kashmir Files : 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाबद्दल रितेशनं शेअर केली पोस्ट; म्हणाला...
- Riteish Deshmukh On Jhund : रितेश देशमुखनं झुंडचं केलं कौतुक; म्हाणाला, 'नागराज मंजुळे हा देशातील...'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)