Payal Sangram Wedding : मैत्री, प्रेम आणि तब्बल 12 वर्ष डेटिंग! अखेर लग्नबंधनात अडकले पायल रोहतगी-संग्राम सिंह
Payal Sangram Wedding : अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) आणि संग्राम सिंह (Sangram Singh) अखेर लग्नबंधनात अडकले आहेत.
Payal Sangram Wedding : अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) आणि संग्राम सिंह (Sangram Singh) अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. आग्र्यात त्यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. गेल्या 12 वर्षापासून दोघे एकमेकांना डेट करत होते. अखेर एका तपानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि विवाह बंधनात अडकले. नुकताच हा विवाहसोहळा पार पडला असून, त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड शेअर केले जात आहेत. या फोटोंमध्ये दोघेही आपल्या नात्यात एक पाऊल पुढे गेल्याबद्दल आनंदी दिसत आहेत.
नुकतेच या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये पायलने सुंदर लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. सोबतच हलका मेकअप आणि भरपूर दागिने परिधान केले आहेत. तर, संग्रामने बेजी रंगाचा शेरवानी परिधान केला आहे. दोघांचा विवाह सोहळा आग्र्यातील जेपी पॅलेसमध्ये पार पडला. लग्नाआधीचे सगळे विधी देखील आग्र्यातच पार पडले आहेत. लग्नाच्या एक दिवस आधी या जोडप्याने प्राचीन मंदिरात जाऊन देवाचे आशीर्वाद घेतले होते.
पाहा फोटो :
View this post on Instagram
धुमधडाक्यात पार पडले लग्न
मागील बऱ्याच काळापासून संग्राम सिंह आणि पायल रोहतगी यांचे लग्न चर्चेत होते. या आधी त्याच्या मेहंदी आणि हळदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले होते. अतिशय धमाकेदार पद्धतीत हे सोहळे पार पडले आहेत. पायल या सगळ्या सोहळ्यात वेगवेगळ्या डिझायनर लेहेंग्यात दिसली होती. तर, लग्नानंतर तिने साडी परिधान केली होती.
चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
लग्नाच्या प्रत्येक सोहळ्यात ही जोडी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली दिसली. दोघांनीही आपले लग्न खूप धुमधडाक्यात आयोजित केले होते. दोघांचे रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. या फोटोंवर कमेंट करत चाहते त्यांना नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे. दोघांचे फोटो इतके क्युट आहेत की, यावरून कुणाचीही नजर हटत नाहीये. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी सात फेरे घेतले आहेत.
आधी पायलने दिला होता लग्नाला नकार!
पायल आणि संग्राम दोघे गेल्या 12 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. प्रत्येक सुख-दुखा:त त्यांनी एकमेकांना भक्कम साथ दिली. मात्र, त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की, पायालने लग्नाला नकार दिला होता. याचा खुलासा स्वतः पायलने एका शोमध्ये केला होता. पायल आई होऊ शकत नसल्याने तिने या लग्नाला नकार दिला होता. मात्र, संग्रामचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही आणि त्याने तिच्याशीच लग्नाचा हट्ट केला. आता ते दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत.
हेही वाचा :
PHOTO: पायल रोहतगीचा संग्रामसोबत रोमँटिक अंदाज, पाहा फोटो!
Lock Upp : ‘खूप प्रयत्न केले आई होण्यासाठी, पण...’, कंगनाच्या जेलमध्ये पायल रोहतगीला अश्रू अनावर!