De Dhakka 2 : ‘आज पंढरीची वारी, 5 ऑगस्टला लंडनवर स्वारी!’, ‘दे धक्का 2’चं नवं पोस्टर पाहिलंत का?
De Dhakka 2 : आषाढी एकादशीचं निमित्त साधून आज (10 जुलै) ‘दे धक्का 2’ या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
De Dhakka 2 New Poster : आज संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशी निमित्ताने विठुरायाची पूजा केली जात आहे. तर, पंढरपुरातही पायी चालत आलेले वारकरी आज विठुरायाचे दर्शन घेत आहेत. याचा खास दिवसाचं निमित्त साधून आज (10 जुलै) ‘दे धक्का 2’ (De Dhakka 2) या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यंदा ही ही गाडी धक्के खात थेट लंडनची वारी करणार असल्याने प्रत्येकाचा मॉर्डन अवतार पाहायला मिळतो आहे. या पोस्टरमध्ये अभिनेते प्रवीण तरडे देखील दिसत असल्याने, चित्रपटात त्यांची देखील महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. हे पोस्टर पाहून आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘आज पंढरीची वारी, 5 ऑगस्टला लंडनवर स्वारी! महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर दिग्दर्शित "दे धक्का 2" तुमच्या जवळच्या सिनेमागृहात 5 ऑगस्टपासून. थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय’, असं कॅप्शन देत चित्रपट निर्माते-मनसे नेते अमेय खोपकर यांनी हे पोस्टर शेअर केले आहे.
पाहा पोस्टर :
आज पंढरीची वारी, ५ ऑगस्टला लंडनवर स्वारी!
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) July 10, 2022
महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर दिग्दर्शित "दे धक्का २"
तुमच्या जवळच्या सिनेमागृहात ५ ऑगस्टपासून.
थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय
घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय#देधक्का२ #पुन्हादेधक्का pic.twitter.com/kTiwo5y3kr
पुन्हा एकदा दिसणार कलाकारांची धमाल!
‘दे धक्का 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘दे धक्का 2’च्या टीझरमुळे प्रेक्षकही उत्सुक झाले असून, त्यांच्या लाडक्या मकरंद जाधव, सुमती जाधव, धनाजी, सूर्यभान जाधव, सायली आणि किसनाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत.
‘दे धक्का’ हा चित्रपट 2008साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. अनेकदा चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागलेले दिसून आले होते. ‘दे धक्का’मध्ये शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर, गौरी वैद्य, सचित पाटील या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाचा पहिला भाग अतुल काळे आणि सुदेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केला होता. तर, महेश मांजरेकरांनी या चित्रपटाचे लेखन केले होते.
यंदा होणार थेट ‘लंडन’वारी!
यावेळेस ही धमाल ट्रीप मुंबई-कोल्हापूर नाही तर, कोल्हापूर ते थेट लंडन असणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. पोस्टरमध्ये लंडनची झलक पाहून यंदा धमाल आणि मनोरंजनाचा मोठा डोस प्रेक्षकांना मिळणार आहे, हे लक्षात येते.
हेही वाचा :
Kubbra Sait : 'बॉलिवूडमध्ये अनेक राक्षस'; कुब्रा सैतला लोकांनी दिला होता सल्ला