एक्स्प्लोर

Hardik Natasha divorce: हार्दिकशी घटस्फोट घेत सर्बियाला मुलासहीत जाणार? नताशा थेटच म्हणाली, 'हार्दिकही फॅमिलीच आहे..'

हार्दिकशी घटस्फोट घेत सर्बियाला मुलासहीत जाणार? नताशा थेटच म्हणाली, 'हार्दिकही फॅमिलीच आहे..'

Hardik Natasha divorce: भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टनेकोविन यांनी जुलै 2024 मध्ये आपल्या घटस्फोटाची घोषणा करत चार वर्षांपासून एकत्र असलेल्या या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना एक मुलगाही आहे. या घोषणेनंतर काही दिवसांनी नताशा सर्बियाला गेली होती. त्यामुळे ती सर्बीयाला अगस्त्यला घेऊन गेली असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु हेाती. या चर्चांना आता नताशानंच ब्रेक दिला आहे. ईटाइम्सला सांगताना नताशा म्हणाली की मी कशी निघून जाणार. मला एक मुलगा आहे. तो शाळेत जातो. हार्दिक पण फॅमिलीच आहे. मी दरवर्षी याच सुमारास सर्बियाला जाते.

हार्दिकही फॅमिलीच आहे..नताशा म्हणाली..

नताशाला सर्बियाला जाण्याविषयी विचारले असता ती म्हणाली, शहरात चर्चा आहे की मी वापस निघून गेले. पण मी कशी जाईन. मला एक मुलगा आहे. तो शाळेत जातो. मी निघून जाण्याची शक्यताच नाही. माझ्या मुलालाही इथे राहण्याची आवश्यकता आहे. तो इथेच आहे. कुटुंब इथे आहे. मी आणि हार्दिकही फॅमिलीच आहोत. आमचं मुल आहे. ते आम्हाला एकत्र बांधून ठेवतं.  अगस्त्यसोबत दोन्ही म्हणजे आई आणि वडिलांनी राहणं आवश्यक आहे. जवळपास १० वर्षांपासून दरवर्षी मी याच काळात सर्बियाला जाते.

घटस्फोटानंतरही हार्दिकसोबत एकत्र सांभाळणार मुलाला

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक या दोघांनी लग्नानंतर चार वर्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दोघांनीही मुलाला एकत्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिकसोबत घटस्फोटाचं कारण सांगण्यासाठी दोघांनाही बोलायचं नसल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं आहे.  त्यांना हा विषय खाजगीच असावा असे वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं होते. दरम्यान, मुलगा अगस्त्यला हार्दिक आणि नताशा एकत्र सांभाळणार असल्याचं नताशानं सांगितलं आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याने त्याच्या मुलाच्या वाढदिवसादिवशी त्याच्यासोबत वेळ घालवत त्याला काही गिफ्ट घेऊन दिले होते. त्यावेळी नताशानं केलेले वक्तव्य चर्चेत होते.

चार वर्षांनंतर घेतला वेगळा होण्याचा निर्णय

हार्दिक पांड्याने 31 मे 2020 रोजी मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले होते. दोघांनी त्याच वर्षी 30 जुलै रोजी मुलाला जन्म दिला. लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनी हार्दिक आणि नताशाने फेब्रुवारी 2023 मध्ये उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केले. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उदयपूरमधील डेस्टिनेशन वेडिंगमध्ये या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या विधींची पुनरावृत्ती केली. यावेळी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. 14 फेब्रुवारी रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्नाचे विधी पार पडले होते. एका दिवसानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MVA Election Manifesto 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने डाव टाकला, जातनिहाय जनगणनेला सुरुवात, 80 हजार कर्मचारी कामाला लावले
विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने डाव टाकला, जातनिहाय जनगणनेला सुरुवात, 80 हजार कर्मचारी कामाला लावले
Maha Vikas Aghadi Manifesto : कंत्राटी नोकरभरती बंद, एमपीएसी निकालासाठी कालमर्यादा, सुशिक्षित बेरोजगारांना मानधन; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात युवकांसाठी काय काय?
कंत्राटी नोकरभरती बंद, एमपीएसी निकालासाठी कालमर्यादा, सुशिक्षित बेरोजगारांना मानधन; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात युवकांसाठी काय काय?
Hiray Family : निमगावच्या 'हिरे' घराण्याची चर्चा तर होणारच; दहा हजार लोकवस्तीच्या गावाने दिले आठ आमदार
निमगावच्या 'हिरे' घराण्याची चर्चा तर होणारच; दहा हजार लोकवस्तीच्या गावाने दिले आठ आमदार
Maha Vikas Aghadi Manifesto : लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआची मोठी घोषणा
लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआची मोठी घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sneha Sonkate Dharashiv : प्रचार साहित्यात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी स्नेहा सोनकाटेंना नोटीसDevendra Fadnavis Speech Manifesto: शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी 'भावांतर' योजना; फडणवीसांची घोषणाNana Patole Bhandara : नाना पटोलेंची लाडकी लेक निवडणूक प्रचारातPraniti Shinde Kolhapur : लाव रे तो व्हिडिओ म्हणत प्रणिती शिंदेंचा महाडिकांवर घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MVA Election Manifesto 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने डाव टाकला, जातनिहाय जनगणनेला सुरुवात, 80 हजार कर्मचारी कामाला लावले
विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने डाव टाकला, जातनिहाय जनगणनेला सुरुवात, 80 हजार कर्मचारी कामाला लावले
Maha Vikas Aghadi Manifesto : कंत्राटी नोकरभरती बंद, एमपीएसी निकालासाठी कालमर्यादा, सुशिक्षित बेरोजगारांना मानधन; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात युवकांसाठी काय काय?
कंत्राटी नोकरभरती बंद, एमपीएसी निकालासाठी कालमर्यादा, सुशिक्षित बेरोजगारांना मानधन; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात युवकांसाठी काय काय?
Hiray Family : निमगावच्या 'हिरे' घराण्याची चर्चा तर होणारच; दहा हजार लोकवस्तीच्या गावाने दिले आठ आमदार
निमगावच्या 'हिरे' घराण्याची चर्चा तर होणारच; दहा हजार लोकवस्तीच्या गावाने दिले आठ आमदार
Maha Vikas Aghadi Manifesto : लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआची मोठी घोषणा
लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआची मोठी घोषणा
Girish Mahajan : अडीच वर्ष झोपले...? सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' आरोपावरून गिरीश महाजनांनी जयंत पाटलांना डिवचलं
अडीच वर्ष झोपले...? सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' आरोपावरून गिरीश महाजनांनी जयंत पाटलांना डिवचलं
US Election 2024 : डोनाल्ड्र ट्रम्प यांची अमेरिकेत एकहाती सत्ता, तब्बल 312 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व; सात महत्वाच्या राज्यांमध्येही दणदणीत विजय
डोनाल्ड्र ट्रम्प यांची अमेरिकेत एकहाती सत्ता, तब्बल 312 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व; सात महत्वाच्या राज्यांमध्येही दणदणीत विजय
Amit Shah: भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
Embed widget