एक्स्प्लोर

मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू

अंधेरी ते घाटकोपर दरम्यान गर्दीच्या वेळेतील ट्रेनचे अंतर 3 मिनिटांवर येणार

मुंबई : लोकलच्या वाऱ्या करणाऱ्या मुंबईकरांसाठी मुंबई मेट्रोकडून (Metro) दिलासा देणारी बातमी आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रवर्तित मुंबई मेट्रो वनकडून वर्सोवा–अंधेरी–घाटकोपर (Mumbai) मार्गिकेवरील सेवा सातत्याने अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि प्रवाशांची सुविधा वाढविण्यासाठी सेवा व्यवस्थेत सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत. त्यानुसार, 10 ऑगस्ट 2026 पासून, सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत मुंबई मेट्रो वनकडून ‘मिक्स्ड-लूप’ ऑपरेशन्स सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये एक ट्रेन घाटकोपर आणि अंधेरीदरम्यानच्या छोट्या फेरीवर (शॉर्ट लूप) धावेल, तर त्यानंतरची ट्रेन घाटकोपर ते वर्सोवा या नेहमीच्या पूर्ण फेरीवर (फुल लूप) धावेल.

मेट्रोच्या सुधारित सेवा व्यवस्थेनुसार अंधेरी आणि घाटकोपरदरम्यान गर्दीच्या वेळेतील ट्रेनचे अंतर 3 मिनिटे 20 सेकंदांवरून 3 मिनिटे इतके कमी होईल. त्यामुळे प्रवासी वाहून नेण्याची क्षमता 20% पेक्षा अधिक वाढेल, म्हणजेच सुमारे 28,000 अतिरिक्त प्रवाशांना वाहतूक सुविधा उपलब्ध होईल.वर्सोवा आणि आझाद नगरदरम्यान गर्दीच्या वेळेतील ट्रेनचे अंतर 362 सेकंद असेल. आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी धावणाऱ्या एकूण ट्रेन फेऱ्यांची संख्या 476 वरून 484 इतकी वाढेल. पहिली शॉर्ट-लूप ट्रेन अंधेरी डाउन प्लॅटफॉर्मवरून सायंकाळी 18:23:06 वाजता सुटेल, तर शेवटची शॉर्ट-लूप ट्रेन 20:23:46 वाजता सुटेल.
या सुधारित सेवा व्यवस्थेमुळे अंधेरी आणि घाटकोपरदरम्यान प्रवास करणाऱ्या 85% पेक्षा अधिक मेट्रो वन प्रवाशांना लाभ होण्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश असेल

a) ट्रेनची वारंवारिता वाढणे
b) प्रतीक्षा वेळ कमी होणे
c) मार्गिकेवरील सर्वाधिक गर्दीच्या भागात अतिरिक्त प्रवासी वाहतूक क्षमता उपलब्ध होणे

मुंबई मेट्रो वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्यामंतक चौधरी म्हणाले, “मिक्स्ड-लूप ऑपरेशन्स हा आमच्या विद्यमान पायाभूत सुविधांच्या क्षमतेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी आणि ट्रेनच्या संचालनाचे अधिक कार्यक्षम नियोजन करण्यासाठी मुंबई मेट्रो वनकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. गर्दीच्या वेळेत ही कार्यपद्धती सुरू करून प्रवाशांचा प्रतीक्षा वेळ कमी करणे, प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढवणे आणि अधिक जलद, सोयीस्कर व विश्वासार्ह सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

मुंबई मेट्रो वनकडून प्रवाशांच्या प्रवासाच्या पद्धतींचे सातत्याने विश्लेषण केले जाते आणि सेवा अधिक प्रभावीपणे देण्यासाठी विविध कार्यप्रणालीतील नवकल्पनांचा वापर केला जातो. यासोबतच सुरक्षितता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेचे सर्वोच्च मानदंड कायम राखले जातात. मुंबईतील प्रवाशांची पसंती असलेली मेट्रो मार्गिका म्हणून मुंबई मेट्रो वन प्रवाशांच्या सुविधेत वाढ करणारे ग्राहक-केंद्रित उपक्रम आणि कार्यप्रणालीतील नवकल्पना सातत्याने राबविण्यास कटिबद्ध आहे. शहराच्या वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यास मदत करणे आणि लाखो मुंबईकरांना जागतिक दर्जाचा प्रवासाचा अनुभव देणे, यासाठी मुंबई मेट्रो वन कार्यरत राहील.

हेही वाचा

दादरमधील कबुतरखान्याची ताडपत्री हटवून काय उभारणार?; BMC चा प्लॅन ठरला, लवकरच होणार कामाला सुरुवात!

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Tukaram Mundhe Marathi News: उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस...कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...
ठाकरे, शिंदे, फडणवीस...तिघांपैकी कोणता मुख्यमंत्री चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...
Mumbai Crime News: शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Embed widget