एक्स्प्लोर

CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?

या शोमधील प्रत्येक पत्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजीत यांच्या टीममध्ये महत्त्वाचा असणारा विवेक या भूमिकेने ही प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळवली होती.

CID fame Actor Vivek: टेलिव्हिजनवरील सगळ्यात लोकप्रिय समजला जाणारा शो CID प्रचंड लोकप्रिय ठरला. या शोमधील प्रत्येक पत्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजीत यांच्या टीममध्ये महत्त्वाचा असणारा विवेक या भूमिकेने ही प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळवली होती. पण सीआयडीनंतर हा अभिनेता पुढे कुठे दिसलाच नाही. ‘CID’मध्ये इन्स्पेक्टर विवेकची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक मशरूने 2012 मध्ये अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला. त्यानंतर त्याने वेडिंग प्लॅनर म्हणून काम केलं, एनजीओमध्ये काम केलं आणि वडिलांचा व्यवसायही सांभाळला. आता तो नेमका कुठे आहे आणि काय करतो?, जाणून घेऊया.

इन्स्पेक्टर विवेक कुठे गायब झाला?

अभिनेता विवेक मशरूने ‘CID’मध्ये इन्स्पेक्टर विवेकची भूमिका साकारली होती. मात्र, नंतर त्याने अभिनय क्षेत्र सोडले. त्याचे नाव आहे विवेक मशरू. त्याने 2006 मध्ये ‘CID’मध्ये एन्ट्री केलेली. सुरुवातीला त्याला केवळ तीन महिन्यांसाठी साइन करण्यात आले होते. मात्र, विवेकने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि तब्बल सहा वर्षे तो या शोचा भाग राहिला. 2012 मध्ये त्यांनी अभिनय सोडला आणि या झगमगाटी दुनियेपासून पूर्णपणे दूर झाले. गेल्या 14 वर्षांपासून विवेक अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. पण सध्या तो कुठे आहे आणि काय करतोय?

विवेक मशरू बंगळुरूतील एका विद्यापीठात प्रोफेसर आहे आणि तेथील विद्यार्थ्यांना शिकवतात, असा काही वर्षांपूर्वी दावा करण्यात आला होता, त्यावेळी स्वतः विवेकने या दाव्याचे खंडन केलं होतं. त्याने आपण नेमके काय करत आहोत, याबद्दल माहिती दिली होती. विवेक मशरूने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तो बंगळुरू विद्यापीठातील एका संपूर्ण विभागाची जबाबदारी सांभाळत होता. मात्र, त्याच वर्षी जुलैमध्ये ते विद्यापीठ सोडणार असल्याचे त्यानं सांगितलं होतं. त्यानंतर काही नवीन शाळा सुरू करण्याची त्याची योजना होती.

विवेक मशरू कसा बनला ‘CID’चा भाग?

विवेक आता काय करतो, हे जाणून घेण्याआधी ‘CID’मध्ये त्यांची एंट्री कशी झाली आणि केवळ तीन महिन्यांसाठी साइन झाल्यानंतर तो तब्बल सहा वर्षे शोमध्ये कसा टिकला, हे जाणून घेऊया. विवेक मशरूने सांगितले होते की, त्याने किशोर नमित यांच्याकडून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याच्या आईने त्याला सांगितले की, ‘CID’च्या निर्मात्यांना एका अधिकाऱ्याच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध आहे. निर्मात्यांनी ‘ऑपरेशन तलाश’ नावाची ऑल इंडिया स्पर्धा आयोजित केली होती. विवेकने ऑडिशन दिली आणि त्याची निवडही झाली.विवेकने सांगितले होते की, त्याचे आजी-आजोबा ‘CID’चे खूप मोठे चाहते होते आणि ते हा शो आवडीने पाहायचे. मात्र, त्याच्या निवडीची घोषणा होण्याच्या काही दिवस आधीच त्यांच्या आजोबांचे निधन झाले. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vivek V Mashru (@vivekvmashru)

2012 मध्ये अभिनय सोडला, वेडिंग प्लॅनर बनला अन्..

विवेक मशरूने सांगितलेलं की, ‘CID’सोबत त्याचा करार सुरुवातीला केवळ तीन महिन्यांचा होता. मात्र, निर्माते तो करार वाढवत गेले. अखेर 2012 मध्ये त्यानं अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो हिमालयात गेला . त्यानंतर परतल्यानंतर विवेकने सिंगापूरमधून उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्याने इंटरनॅशनल बिझनेसमध्ये मास्टर्सची पदवी मिळवली. त्यानंतर  वेगवेगळी कामे केली. चुलत भावाच्या लग्नात त्यानी वेडिंग प्लॅनर म्हणूनही काम केले. याशिवाय वडिलांचा व्यवसाय सांभाळला आणि एका एनजीओमध्येही काम केले.

आता काय करतो विवेक मशरू?

विवेक मशरू यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तो सध्या बंगळुरूमध्ये Ralecon या कंपनीत काम करत आहेत. तो या कंपनीत स्ट्रॅटेजिक ग्रोथ ॲडव्हायझर म्हणून कार्यरत आहे. विवेक विवाहित असून त्याची पत्नी इंग्रजी विषयाची शिक्षिका आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vivek V Mashru (@vivekvmashru)

पोलीसही करायचे सलाम

‘CID’ने विवेक मशरूला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. इतकी की, अनेकदा टोल नाक्यावर त्याच्याकडून टोलही घेतला जात नसे. एखाद्या वेळी त्याने सिग्नल तोडला आणि पोलिसांनी त्यांना थांबवले, तर ‘CID’मधील अधिकारी असल्याचे लक्षात येताच पोलीस त्याला सलाम करायचे. त्यानंतर ऑटोग्राफ घेतल्यानंतरच त्याला पुढे जाऊ दिले जायचे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Embed widget