Varsha Usgaonkar : वेलकम टू बिग बॉस! वर्षा उसगांवकर दिसणार बिग बॉस मराठीच्या घरात? चाहत्यांच्या कमेंट्सनी चर्चांना उधाण
Varsha Usgaonkar : बिग बॉस मराठीच्या घरात वर्षा उसगांवकर यांची देखील एन्ट्री होणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
Varsha Usgaonkar in Bigg Boss Marathi : येत्या 28 जुलै रोजी बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) पाचव्या सिझनचा ग्रँड प्रिमिअर होणार आहे. यंदाच्या सिझनचं होस्टिंग हे रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) करणार असून तो त्याच्या स्टाईलने घरातल्यांची शाळा घेणार आहे. त्यातच आता बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून कोण सहभागी होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे अनेकांची नावं सध्या समोर येत असून आता यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांच्या देखील नावाची चर्चा सुरु झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, तसेच मालिकाविश्वातील अभिनेते विवेक सांगळे आणि चेतन वडनेरे यांच्या नावाची चर्चा सुरु होती. त्यातच आता वर्षा उसगांवकर यांच्या देखील नावाची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात ही मंडळी दिसणार का? याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
वर्षा उसगांवकर दिसणार बिग बॉसच्या घरात?
वर्षा उसगांवकर या स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असंत! या मालिकेत दिसत होत्या. पण त्यांनी आता या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्या असून यावर अनेकांनी कमेंट्स करत त्यांचं बिग बॉसच्या घरात स्वागत केलं आहे. त्यामुळे वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात दिसणार का याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे.
View this post on Instagram
हे कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात?
अंकिता वालावलकर ही सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. त्यामुळे बिग बॉसच्या घरात अंकिताची एन्ट्री होऊ शकते. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरच्या तिच्या काही पोस्टमुळे तिला ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागतं. म्हणूनच बिग बॉसच्या घरात येणारी पहिली स्पर्धक ही अंकिता असणार का? अशा चर्चा सध्या जोर धरु लागल्या आहेत.
दरम्यान चेतन आणि विवेक या दोघांच्याही मालिका संपून बराच काळ लोटला आहे. त्यातच त्या दोघांचे सध्या कोणते प्रोजेक्ट सुरु आहे, याबाबतही काही माहिती नाही. त्यामुळे हे दोघेही आता बिग बॉसच्या घरात दिसू शकतात. पण अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.