Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
या चित्रपटाच्या टीझरनंतर श्रद्धाच्या भूमिकेचं आणि अभिनयाचा सगळीकडे कौतुक होत आहे.

Aai Kuthe kay Karte Fame Actress in Eetha: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या 'ईठा' (Eetha)या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत ती दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरनंतर श्रद्धाच्या भूमिकेचं आणि अभिनयाचा सगळीकडे कौतुक होत आहे. दरम्यान, श्रद्धा कपूरची (Shraddha Kapoor) प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटात 'आई कुठे काय करते' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत गौप्यस्फोट केला. अभिनेत्री राधा सागर (Radha Sagar) आता 'ईठा' चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेत्री राधा सागर ही 'आई कुठे काय करते' या मालिकेतील नकारात्मक भूमिकेमुळे लोकप्रिय झाली होती. तिने या मालिकेमध्ये अंकिताची भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने 'ईठा' चित्रपटात निवड झाल्याचं तिने सांगितलं. तिच्या भूमिकेविषयीही ती बोलली.
ईठामधील भूमिकेविषयी काय म्हणाली अभिनेत्री?
लक्ष्मण उतेकर यांच्या 'ईठा' सिनेमाचा भाग होण्याची संधी मला मिळाली.या चित्रपटात मी एक भूमिका केली आहे. मी ऑडिशन दिली, लुक टेस्ट झाली आणि सिलेक्टही झाले.पण या सिनेमात माझे श्रद्धा कपूरसोबत सीन नाहीत. माझं सिनेमातलं जे कॅरेक्टर आहे, ती स्वतःचा ग्रुप घेऊन आलेली असते.मग आमच्यात स्पर्धा होते की काय होतं हे सिनेमात दिसेल.तिच्यासोबत माझे सीन्स नाहीत.पण आमची भेट झाली.ती फार गोड आहे.सिनेमा खूप कमाल आहे, नक्की बघा ' असं 'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली.
View this post on Instagram
कधी रिलीज होणार चित्रपट?
लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन असणारा ' ईठा' हा चित्रपट 28 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री राधा सागर सोबत सिद्धार्थ जाधव शुभांक एकबोटे हे मराठी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.





















