Dream Girl 2 : ‘ड्रीम गर्ल 2’ने केला मोठा धमाका, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी इतक्या हजारांचे झाले अॅडव्हान्स बुकिंग
ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. धमाकेदार बाब म्हणजे अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच चित्रपटाने मोठा धमाका केल्याचे बघायला मिळत आहे.
![Dream Girl 2 : ‘ड्रीम गर्ल 2’ने केला मोठा धमाका, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी इतक्या हजारांचे झाले अॅडव्हान्स बुकिंग Dream Girl 2 Advance Booking Ayushmman Khurrana Movies Sell 60 Thousand Tickits Before Movie Release Know In Detail Marathi News Dream Girl 2 : ‘ड्रीम गर्ल 2’ने केला मोठा धमाका, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी इतक्या हजारांचे झाले अॅडव्हान्स बुकिंग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/3807d1ff378649e0f4cd9b565d7f20411692775154243766_original.avif?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dream Girl 2 Advance Booking : आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्लच्या मोठ्या यशानंतर आता प्रेक्षक ‘ड्रीम गर्ल 2’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयुष्मान खुराना नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट करत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान हा त्याच्या ड्रीम गर्ल-2 या चित्रपटाचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत होता. या चित्रपटाच्या निमित्ताने पूजाच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे.
आयुष्मान खुराना याचा ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट 25 आॅगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात आयुष्मान खुराना याच्यासोबत अनन्या पांडे ही देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला असून, त्यानंतर हा चित्रपट चांगला कलेक्शन करू शकेल, अशी अपेक्षा आहे. ट्रेलरला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाचा परिणाम अॅडव्हान्स बुकिंगवर होताना दिसत आहे. नुकताच आता ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. धमाकेदार बाब म्हणजे अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच चित्रपटाने मोठा धमाका केल्याचे बघायला मिळत आहे.
एका रिपोर्टनुसार ड्रीम गर्ल-2 ने 22 आॅगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले आहे. ड्रीम गर्ल-2 ने आत्तापर्यंत PVR, INOX आणि Cinepolis मध्ये 60 हजार तिकिटे विकली आहेत. याचाच अर्थ ड्रीम गर्ल-2 सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंगमध्ये आहे. गदर 2 नंतर हा चित्रपट देखील ब्लाॅकबस्टर ठरणार की नाही याकडे आता प्रेक्षकांचे डोळे लागले आहेत.
कधी रिलीज होणार 'ड्रीम गर्ल 2'? (When will 'Dream Girl 2' be released?)
एकता आर कपूर आणि शोभा कपूर निर्मित 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात आयुष्मानसोबतच अनन्या पांडे, परेश रावल, अन्नू कपूर, विजय राज आणि राजपाल यादव हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 'ड्रीम गर्ल-2' हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्ल या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटामधील आयुष्मानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता 'ड्रीम गर्ल-2' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट राज शांडिल्य यांनी दिग्दर्शित केला आहे. ड्रीम गर्ल 2 चित्रपटाच्या माध्यमातून परत एकदा आयुष्मान खुराना हा पूजाच्या पात्रातून चाहत्यांचे जबरदस्त असे मनोरंजन करताना दिसणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)