एक्स्प्लोर

जाणार 'कुली' कुणीकडे? चित्रपटावरून धवन पिता-पुत्रांत मतभेद

दिग्दर्शक आणि निर्माते असलेले डेव्हिड यांना वाटतं कुली नंबर वन सिनेमा ओटीटीवर यायला हवा. पण वरुणला मात्र तसं वाटत नाही. यावरुन धवन पितापुत्रांमध्ये मतभेद सुरु असल्याची माहिती आहे.

मुंबई : अनलॉक इंडियाची प्रक्रिया जशी सुरू झाली तशी अनेक उद्योगांना पुन्हा एकदा नवी आशा लागली आहे. पुन्हा एकदा सगळं स्थिरस्थावर होईल. पुन्हा एकदा गाडी रुळावर येईल अशी आशा बाळगली जाते आहे. मनोरंजनसृष्टीही त्याला अपवाद नाही. जशी थिएटर्स सुरू होतील तसं सिनेमांचं नवं वेळापत्रकही येईल. त्यामुळे ज्यांचे सिनेमे जवळपास पूर्ण आहेत अशांची लगबग सुरू झाली आहे. अशा सिनेमांमध्ये समावेश होतो कुली नंबर 1 या सिनेमाचा.

डेव्हिड धवन दिग्दर्शित कुली नंबर 1 या सिनेमाचा हा नवा सिनेमा रिमेक आहे. यापूर्वी डेव्हिड यांनी आपला मुलगा वरुण धवन याला सोबत घेऊन जुडवा पुन्हा एकदा तयार केला होता. त्यात सलमानच्या जागी वरूण होता. तर करिष्मा आणि रंभाच्या जागी होत्या तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस. तर आता कुली नंबर 1 हा चित्रपट बनून पूर्ण आहे. हा सिनेमा रिलीज करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पण हा सिनेमा नक्की कुठे रिलीज करायचा यावर डेव्हिड धवन आणि वरुण धवन यांच्यात मतभेद झाल्याचं दिसतं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते असलेले डेव्हिड यांना वाटतं हा सिनेमा ओटीटीवर आता यायला हवा. या  चित्रपटाचे आणखी एक निर्माते वाशू भगनानी यांनाही हा सिनेमा ओटीटीवर यावा असं वाटतं. पण त्या पलिकडे वरुणला मात्र तसं वाटत नाही.

वरुणच्या मतानुसार हा चित्रपट थिएटरवर यायला हवा. ओटीटीवर सिनेमा आणू नये निदान आत्ता तरी आणू नये असं त्याचं म्हणणं. गेल्या काही महिन्यांपासून ओटीटीवर आलेल्या सिनेमांचा व्यवसाय बघता असं वाटणं स्वाभाविक आहे. शिवाय सुशांतच्या मृत्युूनंतर इंडस्ट्रीला नेपोटिझमवरून बरंच काही झेलावं लागलं आहे. अशात हा सिनेमा रिलीज करू नये असं त्याला वाटतं. यापूर्वी ही चर्चा दबकी होती. पण आता बॉलिवूड जगतात या मतभेदांची चर्चा उघड होते आहे. याला अधिकृत असा दुजोरा मात्र धवन कुटुंबियांपैकी कुणीही दिलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
Singer Salim Kodathur: मित्राच्या सल्ल्याने वापरली फेअरनेस क्रीम, प्रसिद्ध गायकाच्या किडनीवर झाला गंभीर परिणाम; नेमकं काय घडलं?
मित्राच्या सल्ल्याने वापरली फेअरनेस क्रीम, प्रसिद्ध गायकाच्या किडनीवर झाला गंभीर परिणाम; नेमकं काय घडलं?
Prasad Oak: प्रसाद ओक नव्या भूमिकेत झळकणार; हिंदी सिनेमात एन्ट्री, चित्रपटाचं नाव काय? कधी रिलीज होणार?
प्रसाद ओक नव्या भूमिकेत झळकणार; हिंदी सिनेमात एन्ट्री, चित्रपटाचं नाव काय? कधी रिलीज होणार?
Sanket Pathak: '...चपलेने मारायची वेळ आलीये'; राजकीय व्यक्तीचा उल्लेख करत मराठी अभिनेता भडकला, म्हणाला, 'याचा गेम आता मी...
'...चपलेने मारायची वेळ आलीये'; राजकीय व्यक्तीचा उल्लेख करत मराठी अभिनेता भडकला, म्हणाला, 'याचा गेम आता मी...

व्हिडीओ

Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Nitin Gadkari News :40 टक्के प्रदूषणाला माझा विभाग जबाबदार, नागपुरात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nilesh Lanke VIDEO : मला सहा महिने गृहमंत्री करा, बत्त्या गुल करतो, निलेश लंकेंचा इशारा नेमका कोणाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Maharashtra Government Doctors Demands : सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
Multibagger Stock : 2 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 360 रुपयांवर पोहोचला, तब्बल 17000 टक्के रिटर्न, 1 लाखांची गुंतवणूक करणारे बनले कोट्यधीश
2 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 360 रुपयांवर पोहोचला, तब्बल 17000 टक्के रिटर्न, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
Sensex Nifty Stock Market : सोने चांदीच्या दरात पुन्हा तेजी, दुसरीकडे सेन्सेक्स-निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले, ट्रम्प कनेक्शन समोर
सेन्सेक्स-निफ्टीत घसरण, शेअर बाजारात पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचं नुकसान, 6 लाख कोटी बुडाले
Embed widget