Viral Video | दिशा पटानीच्या डान्सने चाहते घायाळ, व्हिडीओ व्हायरल
आपल्या डान्सने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री दिशा पटानी (Disha patani)चा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुंबई : दिशा पटानी पुन्हा एकदा आपल्या डान्स परफॉर्मन्सने आपल्या चाहत्यांचं मन जिंकून घेण्यासाठी आली आहे. दिशाचे एक नविन गाणे यूट्यूबवर रिलीज झाले असून त्यामध्ये Mere Naseeb Mein या आवडत्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हे गाणे युट्यूबवर अपलोड होताच व्हायरल झाले असून काही तासातच तब्बल दोन लाख लोकांनी ते पाहिले आहे.
दिशा पाटनी या गाण्यामध्ये डान्सिंग पार्टनर डिंपल कोटेचासोबत थिरकताना दिसत आहे. दिशाचे हे आवडते गाणे 1980 सालातील असून या गाण्याचे अनेक रिमेक बनले आहे. गाण्यामध्ये संगीत फार दमदार आहे. दिशाच्या या गाण्याची कोरिओग्राफी अंकन सेनने केली आहे.
दिशाचा हा व्हिडीओ 1 मिनीटं 24 सेकंदाचा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.
अभिनेत्री दिशा पटानीला सोशल मीडिया क्वीन म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. दिशा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतात.
संबंधित बातम्या :