'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'च्या छुटकीने यश चोप्रांची सांगितली भन्नाट आठवण, म्हणाली काजोलच्या एका मागणीवर सेटवर...
हा रोल अभिनेत्री पूजा रूपारेल हिने केला होता. नुकतंच पूजाने या चित्रपटाच्या निर्माते यश चोप्रांबद्दल काही मनोरंजक गोष्टी उघड केल्या आहेत.

Dilwale Dulhania Le Jayenge: ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ला प्रदर्शित होऊन तब्बल 30 वर्षं उलटली आहेत. तरीसुद्धा या चित्रपटाच्या आठवणी आजही प्रेक्षकांच्या आणि कलाकारांच्या मनात ताज्या आहेत. आजही हा चित्रपट अनेकांसाठी एक खास भावना आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने आपला रोल मनापासून साकारला होता. यातीलच एक लक्षवेधी पात्र म्हणजे सिमरनची बहीण ‘छुटकी’. हा रोल अभिनेत्री पूजा रूपारेल हिने केला होता. नुकतंच पूजाने या चित्रपटाच्या निर्माते यश चोप्रांबद्दल काही मनोरंजक गोष्टी उघड केल्या आहेत.
काजोलच्या एका मागणीवर DDLJ च्या सेटवर..
पिंकविलाशी खास मुलाखतीदरम्यान पूजाने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’च्या शूटिंगमधील अनेक आठवणी शेअर केल्या. तिने सांगितलं की, “सेटवर यश चोपड़ा हे सगळ्यांसाठी वडिलांसारखे होते. त्यांचं वागणं खूप आपुलकीचं आणि काळजीवाहू होतं.” पूजा म्हणाली, “ते अगदी पापा-टाइप होते आणि त्यांनी सगळ्यांना बिघडवलं होतं! एकदा काजोलने आइसक्रीम खायची इच्छा व्यक्त केली होती. त्या वेळी भारतात नुकतंच बास्किन रॉबिन्स आलं होतं आणि ते खूप महाग होतं. आम्ही तेव्हा फक्त फ्री टेस्टिंग करून खुश व्हायचो आणि नंतर अमूलवर समाधान मानायचो. पण त्या दिवशी लंचटाइमला मोठमोठे आइसक्रीम टब सेटवर आले होते.”
काजोलच्या एका मागणीवर यश चोप्रांनी अगदी वडिलांसारखी प्रेमळ प्रतिक्रिया दिली आणि सर्व कलाकारांची इच्छा पूर्ण केली. पूजा रूपारेलने सांगितलं की, यश चोप्रा हे सेटवरील सगळ्यांवर मुलांसारखं प्रेम करत असत.
View this post on Instagram
30 वर्षांनंतरही ‘डीडीएलजे’ची जादू कायम
20 ऑक्टोबर 1995 रोजी शाहरुख खान आणि काजोलचा हा रोमँटिक चित्रपट प्रदर्शित झाला. केवळ 4 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 53.5 कोटींचा गल्ला जमवून मेकर्सना तब्बल 1225 टक्के नफा देऊन गेला. या चित्रपटातून आदित्य चोप्रांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं, तर त्यांचे वडील यश चोप्रा हे चित्रपटाचे निर्माता होते. काजोल आणि शाहरुख खान व्यतिरिक्त या चित्रपटात पूजा रूपारेल, अमरीश पुरी, अनुपम खेर, फरीदा जलाल, सतीश शाह, मंदिरा बेदी आणि परमीत सेठी यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
























