धूम 2 ला चौदा वर्षं पूर्ण, ह्रतिक-ऐश्वर्याचा हॉट अवतार आजही प्रेक्षकांच्या आठवणीत
धूम 2 ने मोठं यश मिळवलं होतं. ह्रतिक-ऐश्वर्याच्या या सिनेमातल्या उपस्थितीने या सिनेमाचं ग्लॅमर कमालीचं वाढलं.
![धूम 2 ला चौदा वर्षं पूर्ण, ह्रतिक-ऐश्वर्याचा हॉट अवतार आजही प्रेक्षकांच्या आठवणीत Dhoom 2 completes 14 years hot look of Hrithik Roshan and Aishwarya rai bachchan still remembered by viewers धूम 2 ला चौदा वर्षं पूर्ण, ह्रतिक-ऐश्वर्याचा हॉट अवतार आजही प्रेक्षकांच्या आठवणीत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/25214716/dhoom2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : वायआरएफच्या धूम 2 नं तुफान लोकप्रियता मिळवली होती. याला दोन कारणं होती. पहिलं कारण असं की धूम या आलेल्या पहिल्या भागाने मोठी लोकप्रियता मिळवली. लार्जर दॅन लाईफ असं काहीतरी या सिनेमानं दाखवलं. अट्टल चोर आणि त्याच्यामागे धावणारे पोलीस.. असा हा ससेमिरा धूमनं कमाल दाखवला. जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, उदय चोप्रा, इशा देओल अशी सगळी मंडळी या सिनेमात होती. लव, लस्ट, अॅक्शन असा सगळा मसाला यात ठासून भरला होता. आणि त्यानंतर जाहीर झाला होता तो धूम 2 हा चित्रपट. त्यामुळे या नव्या सिनेमात काय असेल याची उत्सुकता असतानाच त्यातले कलाकार जाहीर झाले आणि लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. या सिनेमात होती ह्रतिक रोशन आणि ऐश्वर्या राय ही हॉट जोडी.
ह्रतिक रोशन आणि ऐश्वर्या या दोघांनीही आपआपल्या सिनेमांतून लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतंच. पण त्याही पलिकडे ही जोडी आता काय नवं घेऊन येणार याकडे अनेकांचं लक्ष होतं. पण हा सिनेमा बनवणारा होता आदित्य चोप्रा. त्याने यापूर्वी एकदा धूममधून लोकांचं तुफान मनोरंजन केलं होतं. आता त्या पलिकडची उडी त्याला ठोकायची होती. म्हणूनच ह्रतिक रोशन आणि ऐश्वर्या राय या दोघांनाही त्याने इतकं हॉट दाखवलं ही त्यांना पुन्हा पुन्हा बघण्यासाठी पब्लिक थिएटरकडे वळलं. ह्रतिक रोशन यापूर्वीच्या सिनेमांमधून डान्सर म्हणून नावारुपाला आला होताच. पण त्याच्या नृत्यात जरा तोच तोचपणाही दिसू लागला होता. कहो ना प्यार है सिनेमातल्या डान्स स्टेप्स लोकप्रिय झाल्या. पण त्या पलिकडे त्याची कुवत आजमावून पाहिली गेली नव्हती. श्यामक दावरने ते शिवधनुष्य पेललं. म्हणून या जोडीचं ते हॉट गाणं आजही लोकांना लक्षात आहे. ह्रतिक आणि ऐश्वर्याचा तो हॉट अवतार काबिले तारीफ होता.
याबद्दल बोलताना श्यामक दावरची कमेंटही तशीच आहे. तो म्हणतो, 'ह्रतिक आणि ऐश्वर्या पहिल्यांदाच एकत्र येत होते. ऐश्वर्यासोबत मी तालमध्ये काम केलं होतं. त्यामुळे ती कशी आणि कुठे कम्फर्टेबल आहे हे मला माहीत होतं. एका सुफी शोमध्ये ती मिस वर्ल्ड होण्याआधीही मी तिच्यासोबत काम केलं होतं. पण ह्रतिकचं तसं नव्हतं. तो आणि मी पहिल्यांदाच काम करत होतो. त्याचा नाच मी पाहिला होता. तो अप्रतिम डान्सर आहे. त्याला वेगळ्या स्टाईलमध्ये नाचवणं माझं काम होतं. पण तो खूपच सहकार्य करत होता. मी सांगेल ते त्यानं केलं. थोडी जॅझ स्टाईल त्यात मी आणली होती. आजवरचं मी पाहिलेलं हे सर्वात कूल कपल आहे.'
धूम 2 ने मोठं यश मिळवलं होतं. ह्रतिक-ऐश्वर्याच्या या सिनेमातल्या उपस्थितीने या सिनेमाचं ग्लॅमर कमालीचं वाढलं. अभिषेक-उदय चोप्रा यांच्यासारखे कलाकार असूनही ही जोडी पडद्यावर आली की बाकी सगळे निष्प्रभ ठरत. धूम 2 मधला ऐश्वर्याचा अवतरा पुन्हा फार अभावाने पाहायला मिळाला. ही जोडी पुन्हा जोधा अकबरच्या निमित्ताने एकत्र आली त्यावेळी ही जोडी अस्सल पारंपरिक थाटातही तितकीच श्रीमंती दिसते हेच यातून सिद्ध झालं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)