ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटानंतर धनुष 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करतोय? पार्टीतील व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
Dhanush Dating With Mrunal Thakur: सध्या इंडस्ट्रीमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बर्थडे पार्टीची खूप चर्चा सुरू आहे. या पार्टीला धनुषही आवर्जुन उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे.

Dhanush Dating With Mrunal Thakur: साऊथच्या सुपरस्टार्सच्या (South Superstar) यादीत आपलं स्थान निर्माण केलेला अभिनेका धनुष (Actor Dhanush), नेहमीच आपल्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमांमुळे चर्चेत असतो. धनुषनं थलायवा सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या मुलीशी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर ऐश्वर्या आणि धनुषनं आपल्या सुखी संसारातून काडीमोड घेत वेगळं होण्याचा निर्णय घेतला. धनुषनं पत्नी ऐश्वर्याला एप्रिल 2024 मध्ये घटस्फोट दिला होता. तरीसुद्धा काही दिवसांपूर्वी दोघेही त्यांच्या मोठ्या मुलाच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीला एकत्र दिसलेले. दोघेही एकमेकांपासून वेगळे झालेले असले, तरीसुद्धा मुलांसाठी दोघेही अनेकदा एकत्र दिसून आलेत. एकीकडे धनुषनं घटस्फोट घेतला असून दुसरीकडे तो सध्या सिंगल आहे. अशातच आता धनुषच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं आहे. साऊथ सुपरस्टार धनुष एका मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करत असल्याचं बोललं जात आहे.
सध्या इंडस्ट्रीमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बर्थडे पार्टीची खूप चर्चा सुरू आहे. या पार्टीला धनुषही आवर्जुन उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्टीतला एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या पार्टीत धनुष आणि ही अभिनेत्री हातात हात धरुन एकत्र गप्पा मारत असल्याचं पाहायला मिळतंय.
आम्ही ज्या मराठमोळ्या अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, त्या अभिनेत्रीचं नाव मृणाल ठाकूर (Mrunal Thakur). अभिनेता धनुषनं मृणाल ठाकूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती आणि आता त्या पार्टीतून एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये धनुष मृणाल ठाकूरचा हात धरून गप्पा मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओनंतर मृणाल ठाकूर आणि धनुषच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Dhanush and Mrunal Thakur are dating? pic.twitter.com/ItWYJdsm8a
— Aryan (@Pokeamole_) August 3, 2025
यापूर्वी 'या' अभिनेत्यांसोबत जोडलं गेलेलं मृणाल ठाकूरचं नाव
बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये समाविष्ट होणारी अभिनेत्री मृणाल ठाकूरचं नाव यापूर्वी अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलेलं. यामध्ये बादशाह ते सिद्धांत चतुर्वेदी, कुशल टंडन, अरिजित तनेजा आणि शरद त्रिपाठी यांचा समावेश आहे. तर, दुसरीकडे धनुष घटस्फोटीत आहे. त्यानं रजनिकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत लग्न केलेलं. तब्बल 18 वर्ष सुखी संसाराचा गाडा हाकल्यानंतर दोघांमध्ये मतभेद झाले आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये दोघांनी वेगळं होण्याची घोषणा केली. त्यानंतर, एप्रिल 2024 मध्ये धनुष आणि ऐश्वर्याचा घटस्फोट झाला. त्यांना दोन मुले आहेत.
दरम्यान, दोघांच्याही वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, धनुष आता कृती सेननसोबत 'तेरे इश्क में' चित्रपटात दिसणार आहे आणि हा चित्रपट 28 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर, मृणाल ठाकूर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटात दिसून आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























