एक्स्प्लोर

मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटप,बंगले वाटप करुन 'संगीत मानापमान'ला आलोय; ट्रेलर लॉन्च सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ!

Devendra Fadnavis : संगीत मानापमान या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या राजकीय टोलेबाजीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Devendra Fadnavis : मराठीतली एक अभिजात कलाकृती 'संगीत मानापमान' (Sangeet Manapmaan) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 10 जानेवारी रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्याआधी नुकताच सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील हजेरी लावली. मानापमानच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांच्या राजकीय टोलेबाजीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 

मी मागच्या दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करुन, खाते वाटप करुन, बंगले वाटप करुन, ऑफिस वाटप करुन संगीत मानापमानला आलोय, असं म्हणत मिश्किल टीप्पणी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. त्याचप्रमाणे त्यांनी संपूर्ण टीमलाही शुभेच्छा दिल्या. मराठी सिनेमांना उत्तम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी काम करण्याची आमचीही इच्छा आहे, असंही ते यावेळी म्हणाले. 

'आमच्याकडे मानापमान मनात होतो आणि...'

मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं की, मी मागच्या दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करुन, खाते वाटप करुन, बंगले वाटप करुन, ऑफिस वाटप करुन संगीत मानापमानला आलोय. आमच्याकडे मानापमान मनात होतो आणि त्याचं संगीत मीडियात वाजतं. पण मला अतिशय आनंद आहे की, या क्षणाचा साक्षीदार मी होऊ शकतोय. याचं कारण की 113 वर्ष सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता ज्या संगीत नाटकामध्ये आहे, ते नाटक  आज रुपेरी पडद्यावर नव्या स्वरुपात आपल्याला पाहायला मिळतंय. 

'आम्हालाही असं करावं लागतं...'

पुढे त्यांनी म्हटलं की,सुबोध भावेंनी बालगंधर्व साकारले. त्यामुळे त्यांनी भामिनीही साकारली. आता ते धैर्यधरही साकारत आहेत, हा देखील एक योगायोग आहे. पण आम्हालाही असं करावं लागतं. मुख्यमंत्री व्हावं लागतं, मग विरोधी पक्षनेता व्हावं लागतं, मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं आणि पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं. पण मला असं वाटतं की, संगीत मानापमान हा 113 वर्षांचा इतिहास आहे. याबद्दल इतक्या वेगवेगळ्या दंतकथा आहेत, म्हणजे लोकं असंही सांगतात की, सोन्याचा जो भाव होता, त्याच्याही जास्त दरात या नाटकाची तिकीटं विकली गेलीत. अगदी स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी या नाटकाचे प्रयोग करण्यात आले. त्यामुळे एक मोठा इतिहास याठिकाणी आहे. संगीत नाटकांची एक पंरपरा मराठी भाषेला लाभलेली आहे. मराठी भाषा आता अभिजात भाषा झाली आहे. पण आपलं संगीतही तितकचं अभिजात आहे, नाट्य संगीतही तितकचं अभिजात आहे. या सगळ्या ज्या परंपरा आहे, त्या नवीन स्वरुपामध्ये आपल्यासमोर येणं आवश्यक आहे. 

ही बातमी वाचा : 

आशयघन सिनेसृष्टीचा चेहरा हरपला, प्रायोगिक चित्रपट चळवळीचा खंदा पाईक काळाच्या पडद्याआड; श्याम बेनेगल कालवश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Discharged : सैफ अली खानला डिस्चार्ज, Lilavati रुग्णालयातून घरी दाखल, EXCLUSIVE दृश्येSaif Ali Khan Discharge : व्हाईट शर्ट, डोळ्यांना गॉगल; ६ दिवस उपचार घेऊन सैफ घरी परतलाSanjay Raut And Supriya Sule On Guardian Minister : पालकमंत्रिपदाचा वाद आर्थिक हावरटपणासाठी..राऊतांची टीका, सुप्रिया सुळेंचेही खडेबोलABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 21 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
Embed widget