Aho Vikramaarka Movie : दाक्षिणात्य अभिनेत्याचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, ‘अहो विक्रमार्का’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज
Aho Vikramaarka Movie : ‘अहो विक्रमार्का’ या सिनेमाचं पोस्टर नुकतच रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमात अभिनेता देव गिल झळकरणार आहे.
Aho Vikramaarka Movie : गेल्या अनेक दिवसांपासून देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘अहो विक्रमार्का’(Aho Vikramaarka) चित्रपटाच्या चर्चा सुरु आहेत. दाक्षिणात्य अभिनेता देव गिल (Dev Gill) ‘अहो विक्रमार्का’च्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. या चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर त्याच्या चाहत्यांनी देव गिलचे 75 फूट भव्य पोस्टर बनवले आहेत. सध्या सोशल मीडियावर या पोस्टरची बरीच चर्चा सुरु आहे.
'अहो विक्रमार्का’ चित्रपटसृष्टीतील पहिला मराठी ब्लॉकबस्टर-पॅन इंडिया चित्रपट 5 भाषांमध्ये 30 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. अभूतपूर्व साहस, जाज्वल्य देशाभिमान दाखवत पोलिसांच्या शौर्याला, खाकी वर्दीतल्या हिरोंना सलाम करणारा ‘अहो विक्रमार्का' हा चित्रपट आहे. धडाकेबाज अॅक्शनसीन, नायक नायिका यांच्यातील फुलणारं प्रेम आणि कुटुंबामधील प्रभावी नाट्य अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘अहो विक्रमार्का’ हा मल्टीस्टारर चित्रपट प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन करण्यास सज्ज झालाय.
सिनेमाचा ट्रेलर रिलीज
या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून अॅक्शन,इमोशन्स आणि ड्रामा अशा सगळा मसाला असलेला हा चित्रपट प्रेक्षकांचं ‘फुल्ल ऑन’ मनोरंजन करणार आहे. परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या एका धडाकेबाज पोलिस अधिकाऱ्याची कहाणी दाखवणाऱ्या ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात देव गिल पोलिस अधिकाऱ्याच्या जबरदस्त भूमिकेत पहायला मिळणार आहे.
सिनेमात 'हे' कलाकार झळकणार
मूळचा पुण्याच्या असलेल्या देवला मराठी भाषा तिथली संस्कृती याचा नितांत आदर आहे. मराठीसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने ‘अहो विक्रमार्का’ या भव्य चित्रपटाच्या निर्मितीची धुरा त्याने सांभाळली. सयाजी शिंदे, प्रवीण तरडे, तेजस्विनी पंडित, अनिल नगरकर अशा अनेक मराठी कलाकारांची साथ या चित्रपटासाठी देवला लाभली.
'हा सिनेमा माझ्या आईसाठी...'
हा सिनेमा मी माझ्या आईसाठी बनवला असल्याचं म्हणत देवने ट्रेलर लॉन्च सोहळ्यावेळी त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुढे त्याने म्हटलं की, माझ्या आजवरच्या सर्व कलाकृतीला आणि भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. चाहत्यांच्या या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या आजवरच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ‘अहो विक्रमार्का’ ला सुद्धा हा प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :