(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathi Actor : अभिनेत्याच्या 'त्या' पोस्टमुळे चार तासांतच थकलेले पैसे मिळाले, कोणत्या मालिकेवर व्यक्त केला संताप?
Marathi Actor : अभिनेता आशय कुलकर्णी याच्या सोशल मीडिया पोस्टची सध्या बरीच चर्चा सुरु झाली होती. पण त्याच्या या पोस्टमुळे त्याचे थकलेले पैसे परत मिळाले.
Marathi Actor : अभिनेता आशय कुलकर्णी (Aashay Kulkarni) हा सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुख कळले' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील त्याची भूमिकाही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान आशयने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. नुकतच तो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा या मालिकेतही झळकला होता.
दरम्यान आशयची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या बरीच चर्चेत आली होती. यामध्ये त्याने एका मालिकेत काम केल्यानंतरही त्या मालिकेने त्याचे पैसे थकवल्याचं त्याने सांगितलं होतं. पण आशयने ही पोस्ट टाकताच त्याला चार तासांमध्ये त्याला त्याचे थकलेले पैसे मिळाले. पण आशयने नेमकं कोणत्या मालिकेविषयी भाष्य केलं होतं, असा प्रश्न पडला होता. पण त्याचंही उत्तर त्याने या पोस्टमधून दिलं असल्याचं म्हटलं जातंय.
आशयची पोस्ट काय होती?
आशयने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं होतं की, 'मध्यंतरी मी एका मालिकेत काम केलं होतं. मालिकेने नुकताच 800 भागांचा टप्पा पारही केला आहे. त्या मालिकेचे प्रोडक्शन मॅनेजर, अकाऊंट डिपार्टमेंट, त्या कार्यक्रमाचे ईपी यांना वारंवार फोन केले, मेसेज केले, इमेल केले, तरी पैसे मिळत नाहीयेत. आमच्याकडून रोज शूटला येण्याची अपेक्षा असते, तेही वेळेत. मग वेळेत पैसे देता का येत नाही?'
आशयला मिळाले त्याचे पैसे
आशयने ही पोस्ट टाकताच त्याला त्याचे थकलेले पैसे मिळाले. त्यासंदर्भातही आशयने पोस्ट टाकून माहिती दिली आहे. आशयने म्हटलं की, 'पैसे मिळाले. माझ्या सर्व मित्र मैत्रिणी, हितचिंतक तुमच्या पाठिंब्यासाठी थ्यँक यू'
आशयचा रोख 'या' मालिकेकडे?
दरम्यान आशयने ही पोस्ट मुरांबा मालिकेला उद्देशून लिहिली असल्याचं म्हटलं जात आहे. कारण मुरांबा या मालिकेने नुकताच 800 भागांचा टप्पा पार केला आहे आणि आशय मध्यंतरी रेवाचा बॉयफ्रेंड म्हणून या मालिकेत झळकला होता.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :