Entertainment News Live Updates 10 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
Bali : स्वप्नील जोशीच्या 'बळी'च्या होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर; हॉरर, थ्रिलर सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता
Bali : 'पावनखिंड', 'झिम्मा', 'कारखानीसांची वारी', 'स्टेपनी' नंतर आता 'बळी' (Bali) या सिनेमाचा आता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. रविवारी 17 जुलैला दुपारी एक वाजता हा सिनेमा प्रेक्षकांना प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि पूजा सावंत (Pooja Sawant) मुख्य भूमिकेत आहे.
Myra Vaikul : 'जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल'; 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीने आषाढी एकादशीनिमित्त शेअर केला खास व्हिडीओ
आज महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दोन वर्षांनंतर आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जात आहे. आषाढी एकादशीनिमित्त अनेक कलाकार चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परी अर्थात मायरा वैकुळनेदेखील (Myra Vaikul) आषाढी एकादशीनिमित्त एक खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2'चे बॉक्स ऑफिसवर 50 दिवस पूर्ण; लवकरच पार करणार 250 कोटींचा टप्पा
Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा 20 मे रोजी सिनेमागृहात रिलीज झाला असून सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. ओटीटीवर हा सिनेमा रिलीज झाला असला तरी बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 50 दिवस पूर्ण केले आहेत.
Ranveer vs Wild: दीपिकासाठी फुल आणायला निघालेल्या रणवीरला अश्रू झाले अनावर; बेयर ग्रील्सनं दिलं प्रोत्साहन
Ranveer Singh vs Wild with Bear Grylls : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा रणवीर वर्सेज वाइल्ड (Ranveer vs Wild) या शोमुळे सध्या चर्चेत आहे. शुक्रवारी (8 जुलै) या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. या एपिसोडमध्ये रणवीर हा भावूक झालेला दिसत आहे. 'रणवीर वर्सेज वाइल्ड' या कार्यक्रमाचा होस्ट बेयर ग्रील्सनं (Bear Grylls) रणवीर प्रोत्साहन दिलं.
Mangesh Desai : मंगेश देसाईच्या कारला अपघात; गाडीचे नुकसान
मंगेश देसाई कुटुंबासोबत कर्जत येथे जात असताताना वाशी, कोकण भवन परिसरात कारचा अपघात झाला आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. परंतु गाडीचे नुकसान झाले आहे. गाडीचे नुकसान झाल्याने मंगेश देसाईला आर्थिक फटका बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
