Zaira Wasim Marriage: बॉलिवूडला रामराम केल्यानंतर अमीर खानच्या ऑनस्क्रीन लेकीनं केलं गुपचूप लग्न, नवऱ्यासोबत फोटो शेअर करत म्हणाली...
अभिनय माझ्या धर्माशी विसंगत आहे आणि म्हणून तिने चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. असं ती भावनिक शब्दांत म्हणाली होती

Zaira Wasim Marriage: आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘दंगल’ अनेक नव्या चेहऱ्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणणारा ठरला. त्यातलीच एक होती झायरा वसीम, जिने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली होती. (Zaira Wasim) परंतु फक्त काही वर्षांतच झायराने 2019 मध्ये धार्मिक कारणं देत बॉलिवूडला कायमचा निरोप दिला. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, कारण आहे तिचं लग्न! झायराने स्वतःच सोशल मीडियावर तिच्या लग्नाचा फोटो शेअर करत “कुबूल है x3” अशी कॅप्शन लिहीत चाहत्यांना सरप्राईज दिलं. शुक्रवारी रात्री समोर आलेल्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. (Bollywood News)
झायराने शेअर केलेल्या दोन फोटोंपैकी एका फोटोत ती निकाहनाम्यावर सही करताना दिसते. तिच्या हातावरची मेहंदी आणि सुंदर पन्नाची अंगठी उठून दिसते. दुसऱ्या फोटोत ती आणि तिचा पती चंद्र न्याहळताना दिसत आहेत. मात्र दोघांचाही चेहरा न दाखवल्याने, झायराचा नवरा कोण आहे याबद्दल सर्वांना प्रचंड उत्सुकता आहे. लग्नात झायराने सोनेरी धाग्यांनी सजवलेली लाल ओढणी, तर तिच्या पतीने क्रीम रंगाची शेरवानी आणि स्टोल परिधान केला होता.
View this post on Instagram
झायराचा अभिनय प्रवास
वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी झायरा वसीमने दंगल (2016) मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि गीता फोगटच्या लहानपणीच्या भूमिकेतून लोकप्रियता मिळवली. तिच्या अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पुढे सिक्रेट सुपरस्टार (2017) मध्येही तिने दमदार कामगिरी केली आणि द स्काय इज पिंक (2019) हा तिचा शेवटचा चित्रपट ठरला, ज्यात प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर प्रमुख भूमिकेत होते.
बॉलिवूडचा निरोप का घेतला?
2019 मध्ये झायराने पोस्ट करत सांगितलं की, “अभिनय माझ्या धर्माशी विसंगत आहे”, आणि म्हणून तिने चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. “या क्षेत्राने मला प्रेम आणि प्रसिद्धी दिली, पण त्याचवेळी श्रद्धेपासून दूर नेलं,” असं ती भावनिक शब्दांत म्हणाली होती. आज मात्र तिचं आयुष्य नव्या प्रवासाकडे वळलं आहे, झायरा वसीम आता नववधू म्हणून नव्या सुरुवातीच्या उंबरठ्यावर आहे.























