एक्स्प्लोर

Chinmay Mandlekar : मराठी माणसाच्या डीएनएमध्ये कोणती तीन नावे? चिन्मय मांडलेकरने सांगितली नावे; पाहा व्हिडीओ

Chinmay Mandlekar : अभिनेता-लेखक चिन्मय मांडलेकरचा मा. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानने मोहन वाघ पुरस्काराने सन्मान केला. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना चिन्मयने आपल्या भाषणाने उपस्थितीतांची मने जिंकली.

Chinmay Mandlekar:  मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण बुधवारी (दि. 24 एप्रिल) करण्यात आले. यंदाच्या वर्षी पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये  अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), ए.आर. रहमान (A. R. Rahman), अशोक सराफ (Ashok Saraf), अतुल परचुरे (Atul Parchure), चिन्मय मांडलेकर आदींचा समावेश होता. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सन्मानार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. चिन्मय मांडलेकर यलाही 'गालिब' या नाटकासाठी मोहन वाघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अभिनेता-लेखक  चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) आपल्या भावना व्यक्त केल्या. चिन्मय मांडलेकरने आपल्या अवघ्या काही मिनिटांच्या भाषणात उपस्थितांची मने जिंकली. 

मराठी माणसाच्या डीएनएमध्ये तीन नावे...

चिन्मय मांडेलकरने पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात चिन्यय मांडलेकरने म्हटले की, भारतात जन्माला आलेल्या लोकांच्या मनात काहीजणांचे आदराचे स्थान असते. नकळतपणे या गोष्टी डीएनएमध्ये असतात. मी महाराष्ट्राचा आहे,  त्यामुळे मराठी माणसाच्या डीएनएमध्ये तीन नाव नक्कीच असतात. यामध्ये एक आहेत मंगेशकर, दुसरे आहेत बच्चन आणि तिसरे आहेत सराफ. चिन्मय मांडलेकरच्या वक्तव्यावर सभागृहात 
टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला. 

चिन्मयने पुढे म्हटले की, 'शिवकल्याण राजा' हे अगदी न कळत्या वयापासून कानावर ऐकू येत होते. माझ्या कळण्याच्या वयात पहिला चित्रपट पाहिला तो नमक हराम होता आणि 'अशी ही बनवाबनवी' तर 100 वेळा पाहिला आहे. यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली. त्यामुळे आम्ही या क्षेत्रात कसे तर याचे उत्तर यामध्ये असल्याचे चिन्मय मांडलेकरने सांगितले. 

 

यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची यादी :

मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आतापर्यंत सुमारे 212 व्यक्तींना गेल्या 34 वर्षात हे पुरस्कार प्रदान केले आहेत. 

उत्कृष्ट नाट्य निर्मितीसाठी मोहन वाघ पुरस्कार - चिन्मय मांडलेकर

मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार - अशोक सराफ

मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ चित्रपट सेवा पुरस्कार - पद्मिनी कोल्हापूर

मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ संगीत सेवा पुरस्कार - रुपकुमार राठोड

मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ पत्रकारिता पुरस्कार - भाऊ तोरसेकर

मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार - अतुल परचुरे

मास्टर दिनानाथ मंगेशकर उत्कृष्ट चित्रपट निर्मिती विशेष पुरस्कार - रणदीप हुडा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Audio Clip : बीडचा बाप मीच!वाल्मिक कराडची कथित क्लिप : ABP MajhaSiddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावेABP Majha Headlines : 04 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAnjali Damania : दिवसभरात Dhananjay Munde यांचा राजीनामा घ्या, नाही तर जनहित याचिका दाखल करु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Anil parab मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
Embed widget