(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sandeep Nahar Death | अभिनेता संदीप नाहरचा संशयास्पद मृत्यू, अखेरच्या फेसबुक पोस्टमधून अनेक खुलासे
रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जातं आहे.
मुंबई : अभिनेता संदीप नाहर यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जातं आहे.
'कहने को हमसफर हैं', 'एमएस धोनी', 'केसरी' या चित्रपटांतून संदीप प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. फेसबुकवर जवळपास मृत्यूच्या तीन ते चार तासांपूर्वी त्यांनी एक सोशल मीडिया पोस्टही लिहिली होती. जी पाहता ही त्यांची सुसाईड नोट आहे, असंही मत अनेकांनी मांडलं. फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिलेलं?
आता जगण्याचीच इच्छा उरलेली नाही. जीवनात अनेक सुखदु:ख पाहिली. पण, सध्याच्या घडीला मी ज्या परिस्थितीतून जात आहे ती सहनशीलतेपलीकडची आबे. आत्महत्या करणं पळपुटेपणाचं लक्षण आहे हे मी जाणतो. मलाही जगायचं होतं. पण, अशा जगण्याचा फायदाच काय जिथं शांतता आणि आदराची भावना नाही. पत्नी आणि तिच्या आईनंही मला समजावण्याचा प्रयत्न केला.
माझ्या पत्नीचा स्वभाव वेगळा आहे. ती हायपर आहे, तिच्या आणि माझ्या व्यक्तीमत्त्वामध्ये फार फरक आहेत. रोजचीच भांडणं ऐकण्याची ताकद माझ्यात नाही. यामध्ये तिची काहीही चूक नाही, तिला सर्वकाही सुरळीत वाटतं. पण, माझ्यासाठी तसं काही नाही, असं लिहित त्यानं मनातील भवानांना वाट मोकळी करुन दिली. शिवाय कारकिर्दीतील संघर्षाचीही माहिती दिली. जगाला दाखवण्यासाठी, सारंकाही सुरळीत आहे असं भासवण्यासाठी मी एखादी पोस्ट करतो. पण, प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळं आहे.
FIRST PICS | विवाहसोहळ्यानंतर पहिल्यांदाच पतीसोबत माध्यमांसमोर आली दिया मिर्झा
आपल्या साथीदारासोबतचे असणारे मतभेद त्यानं या पोस्टच्या माध्यमातून समोर आणले आहेत. आईवडिलांचे आभार मानत जीवनाच्या प्रवासात त्यांनी दिलेली साथ किती मोलाची होती हे त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं. इतकंच नव्हे तर, या मुंबई शहराचेही त्यानं आभार मानले. त्यानं केलेली ही सोशल मीडिया पोस्ट आणि त्यानंतर एकाएकी या अभिनेत्याच्या मृत्यूची येणारी चर्चा पाहता साध्या कलाविश्वाला हादरा बसत आहे.
पाहता साध्या कलाविश्वाला हादरा बसत आहे. मात्र, पोस्टमाॅर्टमच्या नंतर याबद्दल काही बोललं जाऊ शकतं असं पोलीसांचे म्हणणे आहे. दरम्यान, तीन तासाआधी त्यानं पोस्ट लिहिली होती. ज्यात आपण जीवनाला आणि पत्नीसोबत सुरु असलेल्या कलहामुळे काही चुकीचा निर्णय घेऊ शकतो असं सांगितलं होतं. सुशांतसिंह राजपूतसोबत संदीप नाहर यानं एम एस धोनी चित्रपटात काम केलं आहे. त्याने छोटू भैय्या ही भूमिका निभावली होती.