(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अवघ्या 10 सेकंदात फूड डिलिवरी... बंगळुरुमधील फास्टेस्ट डिलिवरीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Bengaluru Viral Video: एका विदेशी व्यक्तीने हुशारीने बंगळुरुमध्ये मध्यरात्री स्विगी ऑर्डर केवळ 10 सेकंदात मिळवली, याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Viral Video: जेव्हापासून स्विगी (Swiggy), झोमॅटो (Zomato) यासारखे अॅप्स आले आहेत तेव्हापासून आपल्याला हवं तेव्हा, हव्या त्या फूड जॉईंटवरुन सहज ऑर्डर करणं खूप सोपं झालं आहे. मिडनाईट क्रेविंग असो किंवा अर्लीमॉर्निंग ब्रेकफास्ट... आपण कधीही आणि कुठेही या अॅप्समुळे जेवण ऑर्डर करु शकतो.
अवघ्या 10 सेकंदात स्विगी डिलेवरी :Trending Video
ऑनलाईन फूड डिलिव्हरी मिळाल्यापासून त्याकडे लोकांचा कल वाढत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे या क्षेत्रात स्पर्धाही वाढली असून कंपन्यांमध्ये 30 मिनिटात, 20 मिनीटात डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न केला जातोय. पण ही डिलिव्हरी आपल्याला जर अवघ्या 10 सेकंदात मिळाली तर? काय म्हणताय.... हे अशक्य आहे? अशक्य असं काही नाही, जर डोकं वापरलं तर ते शक्य असल्याचं एका फॉरेनर व्यक्तीने सिद्ध करुन दाखवलं आहे. अवघ्या 10 सेकंदात फूड डिलिव्हरी देणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल (Bengaluru Viral Video) होत आहे.
Bengaluru Viral Video: डोकं वापरलं आणि ....
बंगळुरुमध्ये एक विदेशी व्यक्ती कोरमंगला भागातील एका मॅकडॉनल्डच्या आऊटलेटमध्ये मध्यरात्री गेला असताना त्याला स्टोअर बंद झालं असल्याच सांगण्यात आलं. तेव्हा त्याने पाहिलं की तिथे ऑनलाईन स्विगी, झोमॅटोच्या ऑर्डर स्विकारल्या जात आहे. तेव्हा त्यानं शक्कल लढवली आणि स्विगीवरुन त्या सेम मॅकडॉनल्ड आऊटलेटमध्ये ऑर्डर दिली. त्यानंतर ती ऑर्डर तयार झाल्यावर डिलिवरी देणाऱ्या कर्मचाऱ्याने अवघ्या 10 सेकंदात ती डिलिव्हरी त्या विदेशी व्यक्तीपर्यंत पोहचवली.
हा व्हिडीओ सध्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये अवघ्या 10 सेकंदात डिलिवरी पोहचली आहे. कालेब नावाच्या कॅनडियन माणसाने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ करुन तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Drove to Koramangala for midnight McDonald's, they said they were closed, but the pick-up window was full of delivery guys. What to do?
— Caleb Friesen (@caleb_friesen2) February 8, 2023
I ordered Swiggy from McDonald's to McDonald's. 10-second delivery achieved. pic.twitter.com/W3PhzmGJrT
चातुर्याचे झालं भरभरुन कौतुक
अनेकदा असचं होत की स्टोअर बंद झाल्यानंतरही आउटलेट्समधून ऑनलाइन ऑर्डर स्वीकारल्या जातात. त्या माणसाने लढवलेली या युक्तीमुळे त्याला मध्यरात्रीदेखील ऑर्डर मिळू शकली. सोशल मीडियावर या व्हिडीओला भरपूर लाईक्स मिळत आहेत. तसेच अनेकांनी या विदेशी माणसाच्या चातुर्याचं कौतुक केलं आहे.