घटस्फोटाच्या चर्चेवर युझवेंद्र चहलने पहिल्यांदाच मन केलं मोकळं, धनश्रीचाही उल्लेख टाळला; म्हणाला मी एक...
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. असे असताना चहलने इन्स्टाग्राम खात्यावर आपलं मन मोकळं केलं आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा चांगलेच चर्तेत आले आहेत. त्यांच्या नत्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं म्हटलं जातंय. काही दिवसांपूर्वी या दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं होतं. तसेच एकमेकांनी लग्नातले फोटो डिलिट केले होते. त्यानंतर हे दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चेनंतर आता युझवेंद्र चहल घटस्फोटाच्या चर्चेवर पहिल्यांदाच भडभडून बोलला आहे. त्याने आपल्या या पोस्टमध्ये पत्नी धनश्री वर्माचा उल्लेख टाळला आहे.
युझवेंद्र चहलच्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे?
युझवेंद्र चहलने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर एक स्टोरी ठेवली आहे. या स्टोरीमध्ये त्याने त्याच्या घटस्फोटाच्या चर्चेवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. त्याने या स्टोरीमध्ये मी कोणाचातरी मुलगा आहे, भाऊ आहे, मित्र आहे असं म्हटलंय. मात्र मी कुणाचातरी पती आहे, अशा आशयाचं वाक्य त्याने टाळलं आहे. तसेच धनश्रीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उल्लेख टाळला आहे. त्याने त्याच्या चहत्यांचे या पोस्टमध्ये आभार मानले आहेत.
युझवेंद्र चहलने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काय म्हटलंय?
माझ्या चाहत्यांनी मला अतुट प्रेम आणि पाठिंबा दिला. त्यांच्या या प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी फार कृतज्ञ आहे. त्यांच्याशिवाय मी एवढा मोठा होऊ शकलो नसतो. माझा हा प्रवास थांबलेला नाही. मला माझ्या देशासाठी, माझ्या संघासाठी आणि माझ्या चाहत्यांसाठी आणखी गोलंदाजी करायची आहे. आणखी षटकं टाकायचे आहेत. मी एक खेळाडू आहे. याचा मला अभिमान आहे. सोबतच मी एक मुलगा, भाऊ तसेच मित्र असल्याचाही मला अभिमान आहे. नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. असे असताना समाजमाध्यमांवर अनेक गोष्टी फिरत आहेत. यातील काही गोष्टी खऱ्या नशू शकतात, असं युझवेंद्र चहल म्हणाला आहे.
कायम तुमच्या प्रेमासाठी, पाठिंब्यासाठी प्रयत्नरत राहील
सोबतच, एक मुलगा, भाऊ आणि मित्र म्हणून मी सर्वांना विनंती करतो की अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कारण अशा प्रकारच्या अफवांमुळे मी तसेच माझ्या कुटुंबीयांना फार त्रास होत आहे. माझ्या कुटुंबाने प्रत्येकाचेच चांगले चिंतन्याची शिकवण दिली आहे. कोणताही शॉर्टकट स्वीकारून यश मिळवण्यापेक्षा ते समर्पण आणि कठोर परीश्रमाच्या माध्यमातून मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सोबतच या तत्त्वांशी एकनिष्ठ राहून मी कायम तुमच्या प्रेमासाठी, पाठिंब्यासाठी प्रयत्नरत राहील, असं बोलून युझवेंद्र चहलने आपलं मन मोकळं केलं आहे.
धनश्री वर्मानेह मन केलं होतं मोकळं
दरम्यान, घटस्फोटाच्या चर्चेनंतर धनश्री वर्मानेदेखील आपल्या इन्स्टाग्राम खात्याच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली होती. गेले काही दिवस माझ्यासह माझ्या कुटुंबीयांसाठी फारच कठीण होते. मात्र सध्या कोणत्याही आधाराविना काहीही लिहिलं जात आहे. सत्याची पडताळणी केली जात नाहीये. माझ्या चारित्र्याचं हनन केलं जात असून यामुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का लागत आहे, असं तिनं म्हटलं होतं. त्यानंतर आता या दोघांच्या नात्यात भाविष्यात काय होणार? असे या दोघांचेही फॅन्स विचारत आहेत.
हेही वाचा :
युझीसोबतच्या घटस्फोटाचं कारण हेच? धनश्रीला घट्ट मिठी मारणारा प्रतिक उतेकर कोण?