घटस्फोटाच्या चर्चांवर युजवेंद्र चहलच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया; मनातील खदखद मांडत धनश्री स्पष्टच म्हणाली...
Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce : युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्रीने घटस्फोटाच्या अफवांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून तिने सोशल मीडियावर मनातील खदखद मांडली आहे.
Yuzvendra Chahal - Dhanashree Divorce : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्यात दुरावा आल्याचं सांगितलं जात आहे. इतकंच नाही, तर दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून युजवेंद्र चहल आणि धनश्री विभक्त होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दरम्यान, आता युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्रीने घटस्फोटाच्या अफवांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून तिने सोशल मीडियावर मनातील खदखद मांडली आहे. युजवेंद्र आणि धनश्री लग्नाच्या 4 वर्षानंतर वेगळे होणार असल्याचं बोललं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या दोघांचा घटस्फोट होणार असल्याची माहिती खरी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, याची घोषणा होण्यास वेळ लागेल असंही बोललं जात आहे.
घटस्फोटाच्या चर्चांवर धनश्रीची पहिली प्रतिक्रिया
युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने पहिल्यांदाच घटस्फोटाच्या चर्चांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तिने सोशल मीडियावर अफवांवर भाष्य करत मनातील खदखद मांडली आहे. तिने लिहिले, 'मी माझे नाव आणि इज्जत कमावण्यासाठी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम केले आहेत. माझे मौन हे कमकुवतपणाचे लक्षण नाही; तर ताकदीचे लक्षण आहे. सत्य कोणत्याही ताठ उभे राहते.'
धनश्री वर्मा सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकार
युजवेंद्र चहलपासून विभक्त होण्याच्या बातम्या समोर येत असताना पत्नी धनश्रीला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगला कंटाळलेल्या धनश्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची बाजू मांडली आहे. अलीकडेच, तिने त्याच्या इंस्टाग्रामवर आपलं मत व्यक्त केलं आहे.
धनश्री वर्माने काय म्हटलंय?
धनश्रीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये लिहिलंय, "गेले काही दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे ही तथ्यांशिवाय अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या. माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. हे सर्व माझ्याविरुद्ध द्वेष पसरवणाऱ्या, चेहरा नसलेल्या ट्रोल्सनी केले. अनेक वर्षे कठोर परिश्रम करून मी नाव आणि आदर मिळवला आहे. माझे मौन माझी कमजोरी नाही तर, माझी ताकद आहे. नकारात्मकता ऑनलाइन सहज पसरते पण एखाद्याला प्रोत्साहन देणं आणि उन्नत करणे, ही एक मोठी गोष्ट आहे. मी माझ्या सत्यावर लक्ष केंद्रित करत आहे, माझी मूल्ये अबाधित ठेवत आहे आणि पुढे जात आहे. सत्याला कधीही स्पष्टीकरणाची गरज नसते."
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अभिनेता अजित कुमारचा भीषण अपघात, दुर्घटनेनंतर व्हायरल होणारा गाडीच्या आतला 'तो' VIDEO खरा?