युझीसोबतच्या घटस्फोटाचं कारण हेच? धनश्रीला घट्ट मिठी मारणारा प्रतिक उतेकर कोण?
Who Is Pratik Utekar : युजवेंद्र चहलसोबत घटस्फोटाची चर्चा सुरु असताना धनश्री वर्माचा कोरिओग्राफरसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे.
Dhanashree Pratik Photo Viral : क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा यांचं नातं सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघांच्या नात्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. चहलसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे धनश्री वर्माला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा मोठा सामना करावा लागत आहे. अशात आता धनश्री वर्माचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण धनश्रीला घट्ट मिठी मारत असल्याचं दिसत आहे. या फोटोतील तरुण कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
युझीसोबतच्या घटस्फोटाचं कारण हेच?
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्याकडून घटस्फोटाच्या बातम्या सतत चर्चेत आहेत. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. याशिवाय, चहलने धनश्रीसोबतचे इंस्टाग्रामवरील फोटोही डिलीट केले आहेत. यादरम्यान, धनश्रीचा एक फोटो चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये ती एका कोरिओग्राफरसोबत दिसत आहे. या तरुणासोबतच्या फोटोमुळे धनश्री पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
धनश्री वर्मा अन् प्रतीक उतेकरचा फोटो व्हायरल
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर त्यातच सध्या त्याला वैयक्तिक आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना वेग आला. या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना दोघांपैकी कुणीही याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही आणि दोघांनीही अद्याप घटस्फोटाच्या बातम्यांचं खंडनही केलेलं नाही. हे सर्व घटस्फोटाचं प्रकरण चर्चेत असताना धनश्रीचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोमधील व्यक्ती या दोघांच्या घटस्फोटाचे कारण आहे का? असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत.
धनश्रीला घट्ट मिठी मारणार प्रतिक उतेकर कोण?
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये धनश्री कोरिओग्राफर प्रतीक उतेकर सोबत दिसत आहे. हा फोटो काही महिने जुना असून आता व्हायरल केला जात आहे. धनश्रीने 'झलक दिखला जा' या डान्स रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता, तेव्हा हा फोटो तिथून व्हायरल झाला होता. त्यावेळीही धनश्रीला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. तेव्हा धनश्रीने याबाबत स्पष्टीकरण देत प्रतीक एक चांगला मित्र असल्याचं सांगितलं होतं. आता धनश्री आणि चहलच्या घटस्फोटाबद्दल
बातम्यांदरम्यान, प्रतीक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. क्रिकेटपटू युजवेंद्र चहलपासून वेगळे होण्याच्या बातम्यांदरम्यान, त्याची पत्नी धनश्रीला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक लांब पोस्ट लिहिली आहे. आता धनश्रीने या प्रकरणात तिचे मौन सोडलं आहे. तसेच, कोरिओग्राफर प्रतीक उतेकर यानेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
व्हायरल फोटोवर प्रतीक उतेकरची प्रतिक्रिया
कोरिओग्राफर प्रतीक उतेकरनेही इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, लोक फोटो पाहून कथा रचतात. ही गोष्ट धनश्रीशी जोडलेली आहे. खरंतर, काही महिन्यांपूर्वी, धनश्री आणि प्रतीकचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, जो पाहिल्यानंतर अनेक वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात होत्या. त्यावेळीही युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. प्रतीक आणि धनश्री दोघेही कोरिओग्राफर आहेत, त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात. आता जेव्हा युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या विभक्त होण्याच्या अफवा किंवा बातम्या येत आहेत, तेव्हा या प्रकरणात कोरिओग्राफर प्रतीकचे नाव ओढलं जात आहे. याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :