एक्स्प्लोर

Yodha and Baster Released : बॉक्स ऑफिसवर 'बस्तर'शी दोन हात करणार 'योद्धा', 'शैतान'वर कोण ठरणार वरचढ?

Yodha and Baster Box Office : बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी दोन सिनेमे एन्ट्री करणार आहेत. यामध्ये कोणाची सरशी होणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

Yodha and Baster Box Office : सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) अजय देवगन (Ajay Devgan) आणि आर माधवन (R Madhavan) मुख्य भूमिकेत असलेल्या शैतान सिनेमाची हवा आहे. जगभरात आतापर्यंत या सिनेमाने 100 कोटी रुपयांची कमाई केलीये. त्यातच उद्या म्हणजेच 15 मार्च रोजी बॉक्स ऑफिसवर दोन सिनेमे धडक देणार आहेत. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) मुख्य भूमिकेत असलेला योद्धा (Yodha) आणि अदा शर्मा (Adah Sharma) मुख्य भूमिकेत असलेला बस्तर (Baster) या सिनेमांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन सिनेमांपैकी बॉक्स ऑफिसवर कोणता सिनेमा अव्वल ठरणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

योद्धा या चित्रपटात  सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि राशि खन्ना यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. पण अद्याप या सिनेमात दिशा पटानीची भूमिका नेमकी काय असणार यासंदर्भात अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाहीये. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच बस्तर या सिनेमात अदा शर्मा मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात अदा शर्मा ही नक्षलवादी चळवळीशी दोन हात करणाऱ्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. 

ओपनिंग डेला कोणाची होणार सरशी?

सिद्धार्थ मल्होत्रा, राशि खन्ना आणि दिशा पटानी यांची मुख्य भूमिका असलेल्या योद्धा या सिनेमाने अॅडव्हान्स बुकींमध्ये चांगली कमाई केली असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच  सिद्धार्थ आणि दिशाची फॅन फॉलोइंग चांगली आहे, त्यामुळे हा चित्रपट ओपनिंग डेलाच चांगली कमाई करु शकतो. 7 कोटींहून अधिक कमाई किंवा 8,9 किंवा 10 कोटींच्या घरात कमाई करण्याची शक्यता आहे.  त्याचप्रमाणे बस्तर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा  सुदिप्तो सेन  यांनी सांभाळली असून पहिल्याच दिवशी हा सिनेमा 3-4 कोटी रुपयांची कमाई करण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. 

बस्तर आणि योद्धाची शैतानसोबत टक्कर

अदा शर्माच्या बस्तरसोबत योद्धाची टक्कर होणार आहे. पण या दोन सिनेमांची सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेल्या शैतानसोबत टक्कर होणार आहे. सध्या अजय देवगण आणि आर माधवनचा शैतान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. त्यामुळे या दोन सिनेमांचं रेकॉर्ड कोण मोडून कारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

ही बातमी वाचा : 

Yodha : सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा'ची 'ओपनिंग डे'लाच बॉक्स ऑफिसवर होणार जादू, पहिल्याच दिवशी करणार एवढं कलेक्शन? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  3 PM : 27 Jan 2025 : ABP MajhaMahaKumbh Mela | Amit Shah  यांचं  प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानAmey Khopakar :Chhaava चित्रपटावर MNS ची भूमिका काय? Laxman Utekar Raj Thackeray भेटीची A - Z माहितीPratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांना न विचारताच ST ची भाडेवाढ? प्रताप सरनाईकांची थेट उत्तरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
Baburao Chandore: अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
Embed widget