एक्स्प्लोर

Honey Singh : हनी सिंहवर येणार डॉक्युमेंट्री; वाढदिवशी स्वत:चं केली घोषणा

Honey Singh : हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Honey Singh Documentary : लोकप्रिय गायक आणि रॅपर हनी सिंह (Honey Singh) आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. रॅपरने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट दिली आहे. हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर डॉक्युमेंट्री होणार रिलीज!

हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित असलेली डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. रॅपरने डॉक्युमेंट्रीची घोषणा करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो गाणं गात असून चाहते त्याला दाद देताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे, "माझ्या आयुष्यासंबंधित अनेक गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता हनी आजारी आहे आणि डॉक्युमेंट्री तयार आहे". 

हनी सिंहच्या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन मोजेज सिंहने केलं आहे. तर ऑस्कर पुरस्कार विजेते गुनीत मोंगा या डॉक्युमेंट्रीची निर्मिती करत आहेत. देशातला सगळ्यात मोठा रॅपर बनण्याचा हनी सिंहचा प्रवास या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवण्यात येणार आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. तसेच कुटुंबीय आणि मित्रपरिवाराची झलकदेखील प्रेक्षकांना या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

हनी सिंहचं खरं नाव हिरदेश सिंह आहे. 2003 साली एका पंजाबी रॅप सॉन्गच्या माध्यमातून त्याने संगीतक्षेत्रात पदार्पण केलं. 'ब्राउन रंग', 'देसी कलाकार' आणि 'ब्लू आईस' सारखी अनेक सुपरहिट गाणी त्याने गायली आहेत. तसेच अनेक बॉलिवूड सिनेमांसाठीदेखील त्याने गाणी गायली आहेत. 2015 पासून आजारपणामुळे तो मनोरंजनसृष्टीपासून दूर होता. पण नुकतचं 3.0 या म्यूझिक अल्बमच्या माध्यमातून त्याने कमबॅक केलं आहे. 

गुनीत मोंगा म्हणाला...

हनी सिंहच्या डॉक्युमेंट्रीबद्दल बोलताना निर्माता गुनीत मोंगा म्हणाला, "भारतीय संगीतक्षेत्रात बदल घडवून आणण्यात हनी सिंहचा मोलाचा वाटा आहे. तरुणांमध्ये त्याची चांगलीच क्रेझ आहे. त्याच्या आयुष्यावर एखादी कलाकृती बनवण्याची माझी इच्छा होती. त्यामुळे आता नेटफ्लिक्सच्या बॅनरखाली या डॉक्युमेंट्रीची निर्मिती करण्यास मी सज्ज आहे". गुनीत मोंगाच्या ' एलिफेंट व्हिस्परर्स' या माहितीपटाला नुकताच ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. 

संबंधित बातम्या

Honey Singh: घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय हनी सिंह? व्हायरल व्हिडीओनं चर्चेला उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde Rally | प्रचाराचा शेवटचा दिवस, महायुतीसाठी श्रीकांत शिंदेंचा रोडशोSanjay Shirsat on Kalicharan : कालीचरण यांच्या सभेचा आणि माझा काहीही संबंध नाहीSaroj Patil speech Kagal : Hasan Mushrif नक्की गाडला जाणार, शरद पवारांच्या बहिणीचा हल्लाSharad Pawar Full Speech Baramati| पुढच्या पिढीची गरज, त्यासाठी युगेंद्रला निवडून द्या; शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Embed widget