एक्स्प्लोर

Year Ender 2022: रणवीरचं न्यूड फोटोशूट ते कॉमेडियन वीर दासची कविता; 2022 मधील 'बॉलिवूड कॉन्ट्रोव्हर्सी'

2022 मध्ये काही चित्रपट हिट ठरले तर काही वादग्रस्त ठरले. चित्रपटांबरोबरच कलाकर देखील चर्चेत होते. 2022 मधील 'बॉलिवूड कॉन्ट्रोव्हर्सी' यांच्याबाबत जाणून घेऊयात...

Year Ender 2022: 2022 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोक सज्ज झाले आहेत. 2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी खास वर्ष होते. या वर्षी अनेक चित्रपट हिट ठरले तर काही कलाकारांचा गौरव देखील करण्यात आला.  आरआरआर, ब्रह्मास्त्र, गंगूबाई काठियावाडी यांसारख्या बिग बजेट चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली पण अवघ्या 16 कोटींमध्ये तयार झालेला कांतारा भाव खाऊन गेला. काही चित्रपट हिट ठरले तर काही वादग्रस्त ठरले. चित्रपटांबरोबरच कलाकर देखील चर्चेत होते. काही कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकले तर काही त्यांच्या कामामुळे अडचणीत सापडले. 2022 मधील 'बॉलिवूड कॉन्ट्रोव्हर्सी' यांच्याबाबत जाणून घेऊयात...

द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files)

11 मार्च रोजी प्रसिद्ध झालेला द कश्मीर फाइल्स हा चित्रपट रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात अडकला. या चित्रपटाबद्दल नादव लॅपिड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर द कश्मीर फाइल्स हा चित्रपट पुन्हा चर्चेचा मुद्दा झाला. चित्रपटाच्या कथानकावर काही लोकांनी अक्षेप घेतला होता. 

रणवीर सिंहचं फोटोशूट (Ranveer Singh)

एका मासिकासाठी केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंह हा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. रणवीरचे हे न्युड फोटो व्हायरल होताच काही लोकांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 

काली पोस्टर (Kaali Poster) 

दिग्दर्शिका लीना मणिमेकलाई यांच्या काली या माहितीपटाच्या पोस्टमुळे वाद निर्माण झाला होता. या माहितीपटाच्या  पोस्टरमध्ये माँ कालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली असून, माँ कालीच्या वेशभूषेत ही अभिनेत्री एका हातात त्रिशूळ आणि एका हातात LGBTQ समुदायाचा ध्वज घेऊन दिसत आहे. हे पोस्टर हिंदू समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखावत असल्याचे म्हणत सोशल मीडियावरील युझर्स संतापले होते. 

ब्रह्मास्त्र (Brahmastra)
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट देखील वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणवीर हा मंदिराची घंटा वाजवताना शूज परिधान केलेला दिसला. त्यामुळे नेटकरी या चित्रपटावर भडकले. त्यानंतर अयान मुखर्जीनं यावर स्पष्टीकरण दिले होते. 

लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha)
लाल सिंह चड्ढा हा चित्रपटामुळे देखील कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण झाली. या चित्रपटाच्या कथानकामुळे तसेच चित्रपटामधील कलाकारांच्या जुन्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला होता. 

वीर दासची  (Veer Das) कविता 
अभिनेता आणि कॉमेडियन वीर दासनं अमेरिकेत  वॉशिंग्टन डीसीमध्ये स्टँड अप कॉमेडी शो दरम्यान एक कविता सादर केली. त्यानंतर त्या कवितेवरुन वाद निर्माण झाला. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Most Searched South Films : RRR ते KGF 2; 2022 मध्ये दाक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला; जाणून घ्या सर्वाधिक सर्च केलेले 'टॉप 10' चित्रपट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Hrithik Roshan and Jr NTR War 2 Movie :  हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Wari Loksabhechi Amravati EP 6 : वारी लोकसभेची अमरावतीत...Navneet Rana पु्न्हा खासदार होणार?ABP Majha Headlines : 07 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVidarbha Voting : विदर्भात किती टक्के मतदान झालं, पाहा व्हिडिओ... ABP MajhaSupriya Sule Baramati Loksabha : श्रीनिवास पवारांनी फोडला सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Hrithik Roshan and Jr NTR War 2 Movie :  हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
Nashik Loksabha : भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
Preity Zinta : 'बॅकग्राऊंड नसणाऱ्यांनी बॉलीवूडमध्ये येऊ नये', प्रिती झिंटा असं का म्हणाली?
'बॅकग्राऊंड नसणाऱ्यांनी बॉलीवूडमध्ये येऊ नये', प्रिती झिंटा असं का म्हणाली?
BrahMos Missiles to Philippines : प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात; पहिली खेप फिलिपाइन्सकडे सुपूर्द, दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार
BrahMos Missiles : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रथमच निर्यात; पहिली खेप फिलीपिन्सला सुपूर्द
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
Embed widget