एक्स्प्लोर

Year Ender 2022: लता मंगेशकर ते विक्रम गोखले, या कलाकारांच्या निधनानं पोरकी झाली चित्रपटसृष्टी

2022 या वर्षात काही कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. या कलाकारांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली.

Year Ender 2022:  मनोरंजनसृष्टीतील कलाकारांचा चाहता वर्ग मोठा असतो. हे कलाकार आपल्या कलेनं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतात. 2022 या वर्षात काही कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली. 

पंडित बिरजू महाराज (Birju Maharaj)
प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं 17 जानेवारी 2022  रोजी निधन झालं आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  बिरजू महाराज यांना 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली होती.

अभिनेते रमेश देव (Ramesh Deo)
अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या मनावर अनेक दशकं अधिराज्य  गाजवणारे महान कलावंत अभिनेता रमेश देव यांचे 2 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले आहे . हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी प्राणज्योत मालवली.  

लता मंगेशकर  (Lata Mangeshkar)
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर  यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.  लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात हजारोंचा जनसागर लोटला होता. चित्रपटसृष्टी बरोबरच विविध क्षेत्रातील लोकांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली. 

पंडित शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma)
जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma) यांचं 10 मे 2022 रोजी  निधन झालं आहे. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) 
गोल्डन मॅन, डिस्को किंग अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांचे 15 फेब्रुवारी 2022 रोजी  निधन झाले.  हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने बप्पी लाहिरी यांनी विशेष ओळख निर्माण केली. त्यांच्या तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है तेरा प्यार या बप्पी लाहिरी यांच्या सुपर हिट गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan)
प्रसिद्ध अभिनेते  प्रदीप पटवर्धन यांचे आज 9 ऑगस्ट 2022 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. 65 व्या वर्षी त्यांनी  राहत्या घरी (झावबावाडी, चर्नी रोड ) अखेरचा श्वास घेतला. आपल्या आभिनयानं प्रेक्षकांना भूरळ पाडणारं आणि मराठी चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे प्रदीप पटनवर्धन. त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली. 

केके (Singer KK)
प्रसिद्ध गायक केके यांचे 31 मे 2022 निधन झाले आहे. त्यांना Voice of Love देखील म्हटलं जातं. कोलकाता येथे एका कॉन्सर्टनंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली. केके यांना लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण तिथे डॉक्टर्सनं त्यांना मृत घोषित केलं. वायच्या 53 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

राजू श्रीवास्तव  (Raju Srivastav Death)
अभिनेता आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं 21 सप्टेंबर रोजी निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजू यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली. 'बिग बॉस 3', 'नच बलिए' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केलं. 

सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala)
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची 29 मे 2022 रोजी   भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सिद्धू मुसेवाला निधनानं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

विक्रम  गोखले (Vikram Gokhale)
ज्येष्ठ अभिनेते विक्रम चंद्रकांत यांचे 26 नोव्हेंबर 2022 रोजी यांचे निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयानं अनेक रसिकांच्या मनावर छाप सोडली.   

 सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan)

लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचं 10 डिसेंबर 2022 रोजी निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले

 वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 22 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget