Pradeep Patwardhan : 'निखळ, गुणी अभिनेता गमावला'; प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर दिग्गजांकडून शोक व्यक्त
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Pradeep Patwardhan : मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टीत आपल्या निखळ, निगर्वी स्वभावाने ओळख निर्माण करणारा गुणी अभिनेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, 'रंगभूमी, चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून प्रदीप पटवर्धन यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनामुळे एक सदाबहार, उमदा कलावंत मराठी कलासृष्टीने गमावला आहे. या गुणी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्वीट
एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट शेअर करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, 'मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे.'
मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे. pic.twitter.com/CVjESFYCkf
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 9, 2022
चंद्रकांत पाटील यांनी देखील ट्वीट शेअर करुन प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. मोरूची मावशी असो वा कॉमेडीची बुलेट ट्रेन; त्यांचा अभिनय बघणं हा नेहमीच मन प्रसन्न करणारा अनुभव असायचा. मराठी रसिकमनांत त्यांचं स्थान अढळ आहे. भावपूर्ण श्रद्धांजली ! pic.twitter.com/D8J6dubIbC
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 9, 2022
अमोल कोल्हे यांचे ट्वीट
आपल्या अभिनयाने मराठी रसिक मनाला अनेक दशकं भुरळ घालणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!#PradeepPatvardhan pic.twitter.com/ghMLS0PNV5
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 9, 2022
अभिनेत्री रेणूका शहाणे यांचे ट्वीट
ॐ शांति प्रदीप पटवर्धन 🙏🏾🙏🏾भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏾🙏🏾
— Renuka Shahane (@renukash) August 9, 2022
प्रदीप पटवर्धन यांचे आज (9 ऑगस्ट) हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. 65 व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी ( झावबावाडी, चर्नी रोड ) अखेरचा श्वास घेतला. आपल्या आभिनयानं प्रेक्षकांना भूरळ पाडणारं आणि मराठी चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे प्रदीप पटनवर्धन.
चित्रपटांमध्ये केलं काम
प्रदीप पटवर्धन हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. एक फुल चार हाफ (1991), डान्स पार्टी (1995), मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009), गोळा बेरीज (2012) आणि बॉम्बे वेल्वेट (2015), पोलिस लाईन (2016), नवरा माझा नवसाचा आणि 1234 (2016) या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत होती.
वाचा इतर बातम्या: