Video : किंग खान आला अन् दीड लाखांच्या गर्दीत जिंकून गेला!
World Cup 2023: नुकताच अभिनेता शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

World Cup 2023: विश्वचषक 2023 चा (World Cup 2023) अंतिम सामना पाहण्यासाठी आज (19 नोव्हेंबर) अनेक बॉलिवूड स्टार्स अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) येथील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच अभिनेता शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो आशा भोसले यांच्यासोबत स्टेडियममध्ये बसून मॅच बघताना दिसत आहे. किंग खानच्या या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.
...म्हणून किंग खानचं होतंय कौतुक
नुकताच किंग खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आशा भोसले यांच्या हातात असणारा चहाचा कप शाहरुख घेतो आणि एका व्यक्तीच्या हातात देतो. शाहरुखच्या या कृत्याचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
"तो खरोखर हिरो आहे आणि एक चांगला माणूस देखील आहे", अशी कमेंट एका नेटकऱ्यानं शाहरुखच्या व्हायरल व्हिडीओवर केली आहे. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "यामुळे सगळं जग शाहरुखवर प्रेम करतं"
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
'हे' कलाकार मॅच बघायला नरेंद्र मोदी स्टेडियमवर आले
शाहरुख खान हा त्याच्या संपूर्ण कुटुंबासह नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मॅच बघायला गेला आहे. किंग खानसोबत त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan), मुलगा आर्यन खान आणि लेक सुहाना खान हे देखील वर्ल्डकपची फायनल मॅच बघायला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गेले आहेत. तसेच रणवीर सिंह (Ranveer Singh) ,दीपिका पादुकोण (Deepika Padukone), अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty) हे कलाकार देखील वर्ल्डकपची फायनल मॅच बघायला अहमदाबादमध्ये गेले आहेत.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचे आव्हान
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचे आव्हान मिळाले आहे. टीएम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने चांगली सुरुवात केली. पण 47 धावा केल्यानंतर तो बाद झाला, तर शुभमन गिल केवळ 4 धावा करू शकला. विराट कोहलीही अर्धशतक झळकावून बाद झाला. केएल राहुलने डाव सांभाळला आणि 66 धावांचे योगदान देऊन बाद झाला. वर्ल्डकप कोण जिंकणार? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
World Cup Final: शाहरुखपासून दीपिकापर्यंत! फायनलचा महामुकाबला पहायला कलाकारांची मांदियाळी जमली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
