World Cup Final: शाहरुखपासून दीपिकापर्यंत! फायनलचा महामुकाबला पहायला कलाकारांची मांदियाळी जमली
World Cup 2023: चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी अहमदाबादमध्ये (Ahmedabad) टीम इंडियाला सपोर्ट करताना दिसत आहेत.

World Cup 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Aus) क्रिकेट संघ यांच्यात विश्वचषक 2023 (World Cup 2023) अंतिम सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होत आहे. या सामन्याकडे देशभरातील लोकांच्या नजरा खिळल्या आहेत. चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी अहमदाबादमध्ये (Ahmedabad) टीम इंडियाला सपोर्ट करताना दिसत आहेत.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर मॅच बघायला आलं खान कुटुंब
अभिनेता शाहरुख खान हा आपल्या संपूर्ण कुटुंबासह नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये किंग खानसोबत त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan), मुलगा आर्यन खान आणि लेक सुहाना खान दिसत आहेत.
#WATCH | Actor Shah Rukh Khan and his wife Gauri Khan arrive in Ahmedabad, Gujarat #ICCCricketWorldCup pic.twitter.com/eorOQtvgUG
— ANI (@ANI) November 19, 2023
दीपवीर पोहोचले मॅच पहायला
अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हे दोघे देखील विश्वचषक 2023 चा अंतिम सामना बघायला नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचले आहेत. दीपिका पदुकोणची बहीण अनिशा आणि वडील प्रकाश पदुकोण देखील अंतिम सामना बघायला नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचले आहेत.
View this post on Instagram
आशा भोसले या देखील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मॅच बघायला आलेल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये त्या शाहरुखच्या बाजूला बसून मॅच बघताना दिसत आहेत.
Asha Bhosle vibing with Shah Rukh Khan as Jhoome Jo Pathaan is being played in Narendra Modi Stadium during the final 🥹🤌 check Jay Shah's reaction though 😭 pic.twitter.com/hs3CjYCovK
— sohom (@AwaaraHoon) November 19, 2023
अभिनेत्री अनुष्का शर्मा ही पती विराट कोहलीला आणि अथिया शेट्टी ही तिचा पती के. एल. राहुलला सपोर्ट करताना दिसत आहेत.
The happiness on Anushka Sharma and her mother's face when Virat Kohli reached his fifty. pic.twitter.com/v8NFYiK0by
— Meena 💫 (@Istreetgirl) November 19, 2023
इतर महत्वाच्या बातम्या:























