VIDEO : आधी दुबईमध्ये आलिशान घर आता ताफ्यात रोल्स रॉयस, बॉलिवूडपासून दूर असलेल्या अभिनेत्याची लक्झरी लाईफस्टाईल
Bollywood Actor Buys Rolls Royce : एक बॉलिवूड अभिनेता विवेक ऑबेराय बॉलिवूडपासून दूर असूनही लक्झरी स्टाईल जगताना दिसत आहे.
Bollywood Latest News : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रोफेशनल लाईफ इतकीच त्यांची पर्सनल लाईफही तितकीच चर्चेत असते. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच त्यांच्या वैयक्तिक आयु्ष्याबाबत जाणून घेण्यास त्यांची चाहते फार उत्सुक असतात. बॉलिवूडमध्ये कलाकार होण्याचं स्वप्न घेऊन अनेक कलाकार येतात, काही जण यामध्ये यशस्वी होतात, तर काहींच्या हाती अपयश येते. याशिवाय काही कलाकार एका रात्रीत स्टार बनतात, त्यांना फेम मिळाल्यावर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचतात, पण नंतर गायब होतात. असाच एक अभिनेता म्हणजे विवेक ऑबेराय. सध्या अभिनेता विवेक ऑबेराय बॉलिवूडपासून दूर असूनही लक्झरी स्टाईल जगताना दिसत आहे. त्याने आधी दुबईमध्ये आलिशान घर घेतल्यानंतर आता महागडी रोल्स रॉयस कार खरेदी केली आहे.
अभिनेता विवेक ओबेरॉयने दिवाळीच्या मुहूर्तावर दुबईमध्ये एक नवीन आलिशान घर खरेदी केलं आणि आता त्याने आलिशान कार खरेदी केली आहे. विवेकच्या कार कलेक्शनमध्ये एक नवीन रोल्स रॉयस कार सामील झाली आहे. आपल्या आयुष्यातील यशाचा आनंद साजरा करत विवेक ओबेरॉयने नवीन रोल्स रॉयस कार खरेदी केली. हा क्षण सेलिब्रेट करण्यासाठी त्याने आपल्या कुटुंबासह कारचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने आई-वडील आणि पत्नीसह कार राईडचा आनंद लुटल्याचं दिसत आहे.
विवेक ओबेरॉयने त्याच्या कार कलेक्शनमध्ये एक नवीन सिल्व्हर-ग्रे रंगाची रोल्स रॉयस कार जोडली आहे. विवेक ओबेरॉयने त्याच्या नवीन कारचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो त्याच्या लक्झरी कार घरच्यांना दाखवताना आणि कुटुंबाला नव्या कारमधून राईडवर घेऊन जाताना दिसत आहे. विवेक ओबेरॉयने वडील सुरेश ओबेरॉय आणि आई आणि पत्नी प्रियांका अल्वा यांना आपल्या कारमध्ये बसवलं आणि फिरायला नेलं. मुलाने घेतलेली गाडी पाहून सुरेश ऑबेराय यांनी त्याला मिठी मारली.
विवेक ओबेरॉयने सिल्व्हर-ग्रे रंगाच्या रोल्स रॉयसची झलक चाहत्यांसह शेअर केली आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'यश वेगवेगळ्या आकारात आणि आकारात येते. आणि आज ते असे काहीतरी दिसते. मी माझ्या कुटुंबासोबत हा क्षण साजरा करत आहे हे खूप धन्य आणि भाग्यवान आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Vivek Oberoi : ऐश्वर्यावर प्रेम अन् सलमानसोबतचा वाद, बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद झाल्यावर विवेक ऑबेरायचं आयुष्य कसं होतं?