Vivek Bindra : अरेरे! मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर पत्नीने केला मारहाणीचा आरोप; आठवड्याभरापूर्वीच अडकला होता विवाहबंधनात
Vivek Bindra : मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर त्याच्या पत्नीने मारहाणीचा आरोप केला आहे.

Vivek Bindra : जगाला मोटिव्हेशन देणारा मोटिव्हेशल स्पीकर आणि युट्यूबर विवेक बिंद्रा (Vivek Bindra) सध्या चर्चेत आहे. त्याच्या पत्नीने त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी संदीप महेश्वरीसोबतच्या वादामुळे विवेक चर्चेत आला होता.
विवेक बिंद्रा 6 डिसेंबर 2023 रोडी यानिकासोबत लग्नबंधनात अडकला आहे. लग्नाच्या एका आठवड्यानंतरच पत्नीने त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. नोएडामध्ये त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मीडिया रिपोर्टनुसार, विवेक बिंद्रा (Vivek Bindra) यानिकासोबत 6 डिसेंबर 2023 रोजी लग्नबंधनात अडकला आहे. लग्नाच्या आठ दिवसांनंतर 14 डिसेंबर 2023 रोजी विवेक विरोधात नोएडा सेक्टर 126 पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानिकाने विवेक मारहाण करत असल्याचा आरोप केला आहे.
यानिकाचा भाऊ वैभव क्वात्राने म्हणाला की,"7 डिसेंबर 2023 रोजी पहाटे तीन वाजता विवेक बिंद्रा आपल्या आईसोबत भांडत होता. त्यावेळी यानिका ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. दरम्यान विवेकने यानिकाला एका खोलीत बंद केलं आणि शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने यानिकाला मारहाण केली. यानिकाच्या शरीरावर ते मारहाणीचे वण स्पष्ट दिसत होते. तिला व्यवस्थित ऐकूदेखील येत नाही. दिल्लीतील कैलाश दीपक रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
यानिकाने 14 डिसेंबर 2023 रोजी विवेकविरोधात तक्रार दाखल केली आहे. एकीकडे विवेक बिंद्रा आणि संदीप माहेश्वरी यांचा वाद चर्चेत आहे. दोघेही लोकप्रिय आहेत. विवेकवर कलम 323,504,427 आणि 325 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.
संदीप माहेश्वरी अन् विवेक बिंद्रा चर्चेत!
संदीप माहेश्वरीने युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये दोन मुलं संदीपला सांगत आहेत की, त्यांनी एका मोठ्या युट्यूबरचा कोर्स खरेदी केला. पण काही फायदा झाला नाही. संदीपचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विवेक आणि त्याचा वाद सुरू झाला. संदीपने दुसरी बाजू मांडायला हवी होती, असं मत विवेकने मांडलं आहे.
विवेक बिंद्राबद्दल जाणून घ्या.. (Who is Vivek Bindra)
विवेक बिंद्रा हे मोटिवेशनल स्पीकर असण्यासोबत उद्योगपती आहेत. तसेच ते लोकप्रिय लेखक, वक्ता आणि व्यवसाय प्रशिक्षक आहेत. विविध श्रेणींमध्ये 9 गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह 11 जागतिक विक्रम त्याच्या नावावर आहेत.
संबंधित बातम्या

















