एक्स्प्लोर
येत्या शनिवारी विराट-अनुष्काचं लग्न?
इटलीमध्ये या दोघांचं शुभमंगल होणार आहे.
मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. येत्या शनिवारी म्हणजेच 9 डिसेंबरला विराट-अनुष्का लगीनगाठ बांधणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
महत्त्वाचं म्हणजे इटलीमध्ये या दोघांचं शुभमंगल होणार आहे. 9, 10 आणि 11 डिसेंबरला हा संपूर्ण विवाह सोहळा रंगणार आहे. त्या दोघांचं लग्न हे हिंदू पद्धतीनं होणार असल्याचंही कळतं.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा कसोटी सामना आजच संपला.
आता येत्या 10 डिसेंबरपासून श्रीलंका-भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र विराटला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.
अति क्रिकेट आणि रोटेशन पॉलिसीमुळे विराट कोहलीला विश्रांती दिल्याचं सांगण्यात आलं आहे.
मात्र विराटला आता लग्नासाठीच श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतून मुक्त करण्यात आल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
दरम्यान, विराट आणि अनुष्काने मान्यवर या कपड्यांच्या ब्रँडसाठी नुकतीच जाहिरात केली होती. या दोघांचं नातं आणि लग्नाची थीम यांचा सुरेख मेळ या जाहिरातीत घालण्यात आला आहे. लग्नावेळी पती-पत्नी एकमेकांना अनेक वचन देतात. त्याच थीमवर आधारित विराट आणि अनुष्कानं मॉर्डन वचनं एकमेकांना दिली आहेत.
संबंधित बातम्या
विराटचा लग्नासाठी ब्रेक, डिसेंबरमध्ये अनुष्कासोबत लग्न?
‘मी नेहमी तुझी काळजी घेईन…’, विराटचं अनुष्काला वचन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement