एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
कचरा फेकणाऱ्या अरहानची विराट,अनुष्काला नोटीस
अरहान सिंहने 23 जूनला विराट आणि अनुष्काला ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. “मला आता या प्रकरणावर काहीच बोलायचे नाही, मी त्यांच्या उत्तराची वाट बघतोय,” असं या तरूणाने ‘इंडिया टुडे’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
![कचरा फेकणाऱ्या अरहानची विराट,अनुष्काला नोटीस Virat kohli and Anushka Sharma receive legal notice कचरा फेकणाऱ्या अरहानची विराट,अनुष्काला नोटीस](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/24175755/arhan-contraversy.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : ‘मला सोशल मीडियावर बदनाम करण्यात आलं,’ असं म्हणत अरहान सिंहने विराट कोहली आणि अनुष्का शर्माला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या अरहान सिंह नावाच्या तरुणाला अनुष्का शर्माने झापलं होतं. नंतर विराटने रस्त्यात घडलेल्या या सर्व प्रकाराचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट केला.
अरहान सिंहने 23 जूनला विराट आणि अनुष्काला ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. “मला आता या प्रकरणावर काहीच बोलायचे नाही, मी त्यांच्या उत्तराची वाट बघतोय,” असं या तरूणाने ‘इंडिया टुडे’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
विराटने ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओला 1.25 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले,तर आठ हजारांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला.
सोशल मीडियातून मोठी प्रतिक्रिया उमटल्यानंतर अरहान सिंहने एक पोस्ट लिहित आपली बाजू स्पष्ट केली होती. तर दुसरीकडे, “विराट आणि अनुष्काने प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्या मुलाचा वापर केला,” असं म्हणत अरहानच्या आईनेही विराट आणि अनुष्का शर्मावर टीका केली होती.Saw these people throwing garbage on the road & pulled them up rightfully. Travelling in a luxury car and brains gone for a toss. These people will keep our country clean? Yeah right! If you see something wrong happening like this, do the same & spread awareness. @AnushkaSharma pic.twitter.com/p8flrmcnba
— Virat Kohli (@imVkohli) June 16, 2018
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)