South Star Ravi Prakash: मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....
South Star Ravi Prakash: साऊ अभिनेता रवि प्रकाश लवकरच मराठी सिनेमात झळकणार आहे.

South Star Ravi Prakash Debut in Marathi Film: दाक्षिणात्य सुपरस्टार (South Superstar) रवि प्रकाश (Ravi Prakash) सध्या चर्चेत आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत बऱ्याच सिनेमांमध्ये विविधरंगी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. दरम्यान, तो साऊथ सिनेमासाठी नसून, मराठी सिनेमासाठी चर्चेत आहे. रवि प्रकाश लवकरच 'दशमी' (Dashami) या सिनेमात झळकणार असल्याची माहिती आहे. साऊथ कलाकार मराठी सिनेमात झळकणार असल्यामुळे त्याची विशेष चर्चा होत आहे. विशेष म्हणजे या खास सिनेमासाठी अभिनेता मराठी शिकला होता. मराठी शिकण्यासाठी अभिनेत्याने मराठी टीव्ही विश्वातील एक प्रसिद्ध मालिका पाहिला होती. ती मालिका कोणती जाणून घेऊयात? (Lagnanantar Hoilch Prem)
मराठी सिनेमात साऊथ अभिनेता रवि प्रकाशची एन्ट्री (South Star Ravi Prakash in Marathi Film Dashami)
दिग्दर्शक आणि निर्माता योगेश भोसले सध्या 'दशमी' या सिनेमामुळे चर्चेत आहे. योगेश भोसले यांनी आतापर्यंत 'मंगलाष्टक रिटर्न्स', 'बाजार' आणि 'आम्ही जरांगे' यांसारख्या दर्जेदार सिनेमांचं दिग्दर्शन केलं. आता ते लवकरच 'दशमी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. या सिनेमाची विशेष बाब म्हणजे 'दशमी' या सिनेमात साऊथ कलकार रवि प्रकाश झळकणार आहेत. अलिकडेच 'दशमी' या सिनेमाचा पोस्टर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यात रवि प्रकाशही उपस्थित होता. या खास मराठी सिनेमासाठी ते मराठी कसे शिकले? याबाबत त्यांनी सांगितलं.
View this post on Instagram
रवि प्रकाश पोस्टर लाँचच्या सोहळ्यावेळी म्हणाले की, 'मराठी शिकण्यासाठी मी एक मराठी टीव्ही मालिका पाहायला सुरुवात केली. 'लग्नानंतर होईलच प्रेम' असं त्या मालिकेचं नाव आहे. ही मालिका मी सेटवर बसून लॅपटॉपवर पाहत होतो. अचानक या मालिकेचे कलाकार प्रसन्न केतकर आमच्या सेटवर आले होते. मी तेव्हा प्रसन्नला लॅपटॉपवर पाहत होतो. म्हटलं अरे, हे कसे इथे आले. एका कार्यक्रमात मी गेलो होतो, तिथे 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेचा नायक विजय आंदळकरही उपस्थित होता. तेव्हा मी या मालिकेतील कलाकारांना पाहिलं. सध्या मी कुठली मराठी मालिका पाहत असेन तर, 'लग्नानंतर होईलच प्रेम' हीच मालिका आहे', असं रवि प्रकाश म्हणाला.
रवि प्रकाश अभिनीत 'दशमी' हा सिनेमा दसऱ्याला म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात रिलीज होणार आहे. या साऊथ कलाकाराने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो अन् व्हिडीओ शेअर केले आहेत. या बहुप्रतिक्षित सिनेमात महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम, देवेंद्र गायकवाड, प्रसन्न केतकर, गौरी इंगवले आणि रवि प्रकाश यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. योगेश भोसले दिग्दर्शित हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























