एक्स्प्लोर

Do Aur Do Pyaar teaser : विवाहित विद्या बालन अडकली प्रतिकच्या प्रेमात! 'दो और दो प्यार'चा टीझर आऊट

Do Aur Do Pyaar teaser Vidya Balan Pratik Gandhi :  ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाची जादू चालवल्यानंतर अभिनेत्री विद्या बालन पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे.

Vidya Balan Pratik Gandhi :  ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाची जादू चालवल्यानंतर अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. रोमँटिक कॉमेडी फिल्म  'दो और दो प्यार'चा टीझर आज लाँच करण्यात आला.या चित्रपटात विद्या बालन प्रेमाच्या झांगडगुत्त्यात अडकणार का? हे लवकरच प्रेक्षकांना दिसणार आहे.  या चित्रपटात विद्या बालनसह इलियाना डिक्रूज, प्रतिक गांधी (Pratik Gandhi) आणि सेंथिल राममूर्ती आदींच्या भूमिका आहेत. आज या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला. 

'दो और दो प्यार'चा टीझर मजेशीर आहे. दोन जोडपी आपल्या नात्यांमध्ये स्पार्क कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कधी ते डेटवर जातात तर कधी एकत्र प्रवास करतात. लग्नानंतर सुरुवातीला जे आकर्षण होते ते कसेतरी परत मिळवण्याचा प्रयत्न असतो.

'दो और दो प्यार'च्या टीझरमध्ये काय आहे?

पुरस्कार विजेते ॲड फिल्ममेकर शिर्षा गुहा ठाकुरता यांचा  'दो और दो प्यार' हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये चारही स्टार्स तुम्हाला रोमँटिक अंदाजात दिसतात. सेंथिल आणि विद्या हे जोडपे आहेत आणि इलियाना आणि प्रतिक एकत्र आहेत. दोन्ही जोडप्यांची कहाणी वेगळी आहे. त्यांची लव्हस्टोरी चांगली चालली आहे.मात्र, प्रतिक आणि विद्या एकत्रितपणे बेडवर दिसतात, त्यानंतर काय घडतं हे चित्रपट पाहिल्यावर समजेल. 

View this post on Instagram
 
A post shared by Applause Entertainment (@applausesocial)

'दो और दो प्यार'चा टीझर खूपच मजेशीर आहे. यामध्ये तुम्हाला विद्या आणि सेंथिलमधील उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळेल. तर विद्यासोबत प्रतिक गांधीच्या केमिस्ट्रीचीही झलक पाहायला मिळेल. या चित्रपटात इलियाना डिक्रूझ अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. प्रतिक गांधी हा मध्यमवर्गीय व्यक्तीरेखा साकारत आहे. आता या सर्वांना प्रेमात काही सरप्राईजसोबतच काही गोंधळही दिसणार आहे. या चौघांच्या नात्यात निर्माण झालेली गुंतागुंत कशी सोडवतात हे पाहणे मनोरंजक ठरेल. 

चित्रपटाच्या टीझरमध्ये रोमान्स आणि इमोशनसह मजेशीर संवाद देखील आहेत. अप्लॉज एंटरटेन्मेंटसह एलिप्सिस एंटरटेन्मेंट प्रोडक्शन अंतर्गत चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. 19 एप्रिल 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

श्रीकांत भोसले
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra News: केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंदने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंदने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
Jayant Patil: निवडणुका जाहीर होताच जयंत पाटलांनी मोठा डाव टाकला; सांगलीतील भाजपचे निष्ठावंत गळाला लावले, शरद पवार गटाची ताकद वाढली
निवडणुका जाहीर होताच जयंत पाटलांनी मोठा डाव टाकला; सांगलीतील भाजपचे निष्ठावंत गळाला लावले, शरद पवार गटाची ताकद वाढली
सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पार्थ पवार जमिनीप्रकरणात अजंली दमानिया गौप्यस्फोट करणार
सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पार्थ पवार जमिनीप्रकरणात अजंली दमानिया गौप्यस्फोट करणार
BMC Election 2025 Uddhav Thackeray Eknath Shinde: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Islamabad Blast: इस्लामाबाद कोर्टाबाहेर कारमध्ये स्फोट, 5 ठार; मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
Delhi Blast I 20: स्फोटात वापरलेल्या i20 कारचे CCTV, तीन संशयित कैद
Kolhapur Leopard : दोन तासांच्या थरारानंतर कोल्हापुरातील बिबट्या जेरबंद, नागरिकांचा सुटकेचा निश्वास
Delhi Blast Doctor Connection : पुलवामातील डॉक्टर सज्जा अहमद मल्ला चौकशीसाठी ताब्यात
Kolhapur Leopard Attack: कोल्हापूर शहरात बिबट्याचा थरार, पोलिसावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra News: केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंदने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंदने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
Jayant Patil: निवडणुका जाहीर होताच जयंत पाटलांनी मोठा डाव टाकला; सांगलीतील भाजपचे निष्ठावंत गळाला लावले, शरद पवार गटाची ताकद वाढली
निवडणुका जाहीर होताच जयंत पाटलांनी मोठा डाव टाकला; सांगलीतील भाजपचे निष्ठावंत गळाला लावले, शरद पवार गटाची ताकद वाढली
सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पार्थ पवार जमिनीप्रकरणात अजंली दमानिया गौप्यस्फोट करणार
सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पार्थ पवार जमिनीप्रकरणात अजंली दमानिया गौप्यस्फोट करणार
BMC Election 2025 Uddhav Thackeray Eknath Shinde: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
Dharmendra Net Worth: लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; 300 सिनेमे केलेल्या धर्मेंद्रनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य, नेटवर्थ किती?
लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; धर्मेंद्र यांंनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य
Embed widget