एक्स्प्लोर
प्रसिद्ध विनोदी अभिनेते दिनयार काँट्रॅक्टर यांचं निधन
प्रसिद्ध अभिनेते दिनयार काँट्रॅक्टर यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर वरळीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुंबई : अनोख्या विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं. गुजराती आणि हिंदी रंगभूमीसह बॉलिवूड चित्रपट आणि मालिकांमधूनही त्यांनी आपली छाप सोडली होती. 'मेरे पास बहौत पैसा है' या 'हम सब एक है' मालिकेतील त्यांच्या तोंडी असलेला डायलॉग प्रचंड गाजला होता.
79 व्या वर्षी वयोमानापरत्वे जडलेल्या आजारांमुळे दिनयार काँट्रॅक्टर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर वरळीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
याच वर्षी केंद्र सरकारकडून त्यांचा 'पद्मश्री'ने गौरव करण्यात आला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकताच त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
1966 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी दिनयार काँट्रॅक्टर यांनी कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी अनेक हिंदी आणि गुजराती नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. खिलाडी, बादशाह, चोरी चोरी चुपके चुपके यासारख्या चित्रपटांत ते झळकले होते. खिचडी, तारक मेहता का उल्टा चष्मा यासारख्या गाजलेल्या विनोदी मालिकांचा ते एक भाग होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
